Sunil Tatkare : ‘मी शपथ घेऊन सांगतो की…’; बारामतीत सुनील तटकरेंचं मोठं विधान

मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे यांनी केवळ विरोधकांना इशारा दिला. तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला.

Sunil Tatkare : ‘मी शपथ घेऊन सांगतो की…’; बारामतीत सुनील तटकरेंचं मोठं विधान

Sunil Tatkare: 'अजितदादांच्या पश्चात होत असलेली ही निवडणूक खरं तर बिनविरोध व्हायला हवी होती. पण जर निवडणूक लादलीच जात असेल, तर मी शपथ घेऊन सांगतो की, 1952 पासूनच्या विधानसभा इतिहासातील सर्व रेकॉर्ड तोडून सुनेत्रा वहिनींना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणू,' असा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

बिनविरोधचा प्रयत्न फसला; आता लढाई निश्चित!
अजित पवारांच्या निधनामुळे लागलेल्या या पोटनिवडणुकीत महायुतीने 'बिनविरोध'साठी पूर्ण ताकद लावली होती. मात्र, काँग्रेसने अ‍ॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याने बारामतीत आता प्रत्यक्ष लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महायुतीचे दिग्गज नेते बारामतीत एकत्र आले होते.

तटकरेंचे भावनिक आणि राजकीय आवाहन
मेळाव्यात बोलताना सुनील तटकरे यांनी केवळ विरोधकांना इशारा दिला. तसेच कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश भरला. "आजवरच्या निवडणुकीत जेवढे सर्वाधिक मताधिक्य कोणाला मिळाले असेल, त्यापेक्षा जास्त मतांनी वहिनींना विजयी करणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल. "वहिनी, तुम्ही आज फक्त अर्ज भरा. त्यानंतर थेट प्रचाराच्या शेवटच्या सभेलाच या. मधल्या काळात विजयाची सर्व जबाबदारी आम्ही आणि बारामतीकर पार पाडू," असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांवरील विश्वास अधोरेखित केला.

हेही वाचा – Baramati Byelection 2026 : 'भाजपचा डाव थांबवण्यासाठी…'; काँग्रेस उमेदवार आकाश मोरेंनी स्पष्ट केली सुनेत्रा पवारांविरोधात लढण्यामागील भूमिका

महायुतीचे अभेद्य शक्तीप्रदर्शन
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल आणि इतर मित्रपक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. अजितदादांच्या अनुपस्थितीत होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने महायुतीने पूर्ण ताकद पणाला लावली आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number