‘मी स्टार प्रचारक, खर्चाची चिंता करू नका…’; भरसभेत बावनकुळे असं का म्हणाले?

निवडणूक प्रचार सभेत स्टेजवरील व्यवस्थेबाबत व्यक्त केलेल्या नाराजीदरम्यान त्यांनी केलेली टिप्पणी आता मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.<br/>

‘मी स्टार प्रचारक, खर्चाची चिंता करू नका…’; भरसभेत बावनकुळे असं का म्हणाले?

Chandrashekhar Bawankule statement: गडचिरोली नगरपरिषद निवडणुकीतील प्रचारादरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एका विधानाने स्थानिक राजकारणात चांगलीच खळबळ उडवली आहे. निवडणूक प्रचार सभेत स्टेजवरील व्यवस्थेबाबत व्यक्त केलेल्या नाराजीदरम्यान त्यांनी केलेली टिप्पणी आता मोठ्या चर्चेचा विषय ठरली आहे.

भरसभेत बावनकुळे संतापले

गडचिरोलीतील एका जाहीर सभेत भाषणासाठी उभ्या राहिलेल्या बावनकुळे यांनी पाहिले की, स्टेजसमोरच्या जागेत अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक कडक उन्हात बसलेले आहेत. मंडप अर्धवट असून उर्वरित भाग खुला ठेवण्यात आला होता. हे पाहून ते आयोजकांवर नाराज झाले आणि म्हणाले की, 'माझ्या बहिणी उन्हात बसताना मी बघू शकत नाही… मंडप पूर्ण का बांधला नाही?'

हेही वाचा –  Dombivli Politics: भाजपला मोठा धक्का! रवींद्र चव्हाण यांच्या निकटवर्तीय नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश

मी स्टार प्रचारक, मला हिशोब द्यायची गरज नाही 

दरम्यान, जिल्हाध्यक्षांनी स्पष्टीकरण देत सांगितले की, निवडणूक खर्चाच्या नियमांमुळे मंडपावर जास्त खर्च करता येत नाही. यावर बावनकुळे यांनी ठाम शब्दात प्रत्युत्तर दिले, 'मी स्टार प्रचारक आहे… मला हिशोब द्यायची गरज नाही. निवडणूक आयोगाला आम्ही हिशोब दाखवू. तुम्ही हिशोबासाठी घाबरू नका.' त्यांनी पुढे कार्यकर्त्यांना बजेटची चिंता न करण्याचेही निर्देश दिले.

हेही वाचा – Sanjay Raut Tweet: मुंबई निवडणुकीत नवा ट्विस्ट! राऊतांच्या विधानाने माविआचे समीकरण बिघडले?

विरोधकांचा हल्ला, समर्थकांचा बचाव

या वक्तव्याची आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू आहे. विरोधक म्हणत आहेत की हे विधान निवडणूक खर्चाच्या नियमांवर थेट प्रश्नचिन्ह उभे करते. तर भाजपचे स्थानिक कार्यकर्ते म्हणतात की, हे फक्त आयोजनातील त्रुटींवर बोलताना केलेले हलकेफुलके वक्तव्य होते, त्याचा गैरअर्थ काढू नये.

नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढती रस्सीखेच

राज्यातील नगरपरिषद निवडणुकांसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबर रोजी निकाल लागणार आहेत. अशा संवेदनशील काळात बावनकुळे यांची टिप्पणी राजकीय चर्चेला आणखी धार लावणारी ठरली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number