Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला बाळाला सजवा घरच्या घरी बनवलेल्या हलव्याच्या दागिन्यांनी; वापरा या सोप्या टिप्स

या दिवशी लहान मुलांना काळे कपडे घालून हलव्याच्या दागिन्यांनी सजवण्याची जुनी परंपरा आहे. बाजारात हे दागिने विकत घ्यायला गेल्यास ते महाग तर असतातच, पण अनेकदा ते बाळाच्या नाजूक त्वचेला टोचू शकतात.

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला बाळाला सजवा घरच्या घरी बनवलेल्या हलव्याच्या दागिन्यांनी; वापरा या सोप्या टिप्स

Makar Sankranti Bornhan 2026 : मकर संक्रांतीचा सण आणि लहान मुलांचे 'बोरन्हाण' हे नाते महाराष्ट्रात अत्यंत जिव्हाळ्याचे आहे. या दिवशी लहान मुलांना काळे कपडे घालून हलव्याच्या दागिन्यांनी सजवण्याची जुनी परंपरा आहे. बाजारात हे दागिने विकत घ्यायला गेल्यास ते महाग तर असतातच, पण अनेकदा ते बाळाच्या नाजूक त्वचेसाठी टोचणारे असू शकतात. मात्र, केवळ 100 रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही घरीच सुरक्षित आणि आकर्षक दागिने बनवू शकता. साखरेच्या पाकापासून बनवलेला पांढराशुभ्र हलवा, रंगीत मणी आणि दोऱ्यांच्या साहाय्याने हे दागिने तयार करण्याची पद्धत अत्यंत सोपी आहे.

दागिने बनवण्यासाठी लागणारे आवश्यक साहित्य
घरगुती दागिने तयार करण्यासाठी तुम्हाला फार मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. खालील साहित्याचा वापर करून तुम्ही सुंदर संच बनवू शकता:
– हलवा: 40 ते 50 रुपयांचा पुरेसा आहे.
– दोरा आणि सुई: पांढरा किंवा रंगीत मजबूत सुती दोरा.
– मणी: छोटे रंगीत प्लास्टिक मणी किंवा शोभेचे मोती.
– रिबन: पांढऱ्या किंवा लाल रंगाची सॅटिन रिबन.
– इतर: कात्री, टूथपिक आणि कार्डबोर्डचा तुकडा.

आकर्षक 'हलव्याचा हार' कसा तयार करावा?
हार हा संक्रांतीच्या दागिन्यांमधील मुख्य आकर्षण असतो. तो बनवण्यासाठी खालील पावले उचला:
– माप घेणे: सुरुवातीला बाळाच्या गळ्याच्या मापानुसार दोरा किंवा रिबन कापून घ्या.
– छिद्र पाडणे: हलवा कडक असतो, त्यामुळे सुईने थेट टोचण्यापूर्वी टूथपिकने हलक्या हाताने मधोमध छिद्र पाडा.
– ओवण्याची पद्धत: सुई-दोऱ्याच्या साहाय्याने एक हलवा आणि त्यानंतर एक रंगीत मणी अशा क्रमाने ओवत जा. किंवा तुम्ही डिंकाच्या मदतीने ते चिकटवू शकता. मात्र, लहान मुले ते खाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. किंवा हाही धोका टाळण्यासाठी चिकट भाताचा वापर करता येतो.
– फिनिशिंग: दोन हलव्यांच्या मध्ये मणी घातल्याने हार लवचिक राहतो आणि दिसायलाही उठावदार दिसतो. शेवटी दोन्ही टोकांना मजबूत गाठ मारा.

हेही वाचा – Makar Sankranti 2026 : सूर्यदेवाचा मकर राशीप्रवेश; 2026 मध्ये कोणत्या राशींचे नशीब फळफळणार आणि कोणाला राहावे लागेल सावध?

बाळासाठी 'राजेशाही मुकुट' बनवण्याची पद्धत
मुकुट बनवताना तो बाळाच्या कपाळाला टोचणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे:
– बेस तयार करणे: कार्डबोर्डची एक पातळ पट्टी किंवा जाड रिबन बाळाच्या डोक्याच्या मापाप्रमाणे कापून घ्या.
– हलवे चिकटवणे: या पट्टीवर फेविकॉलच्या साहाय्याने किंवा टाके घालून एकामागे एक हलवे व्यवस्थित बसवा.
– मध्यवर्ती भाग: मुकुटाच्या बरोबर मध्यभागी एक मोठा हलवा किंवा कुंदन लावून त्याला 'राजेशाही' लूक द्या.
– फिटिंग: मुकुटाच्या दोन्ही टोकांना रिबन बांधा जेणेकरून तो डोक्यावर व्यवस्थित बसेल.

महत्त्वाच्या टिप्स आणि खबरदारी
– वजन: लहान मुलांसाठी दागिने बनवताना ते जास्त जड होणार नाहीत याची काळजी घ्या.
– टोचणे: हलव्याचे टोकदार भाग बाळाला टोचू नयेत म्हणून दागिन्यांच्या खालच्या बाजूला मऊ कापड किंवा रिबन लावावी.
– साठवणूक: हे दागिने साखरेचे असल्याने ते ओलावा असलेल्या जागी ठेवू नका, अन्यथा हलवा विरघळू शकतो.
– बोरन्हाण: दागिन्यांसोबतच बोरन्हाणासाठी लागणारे चॉकलेट्स, बोरे आणि कुरमुरे यांचे मिश्रण तयार ठेवण्यास विसरू नका.

हेही वाचा – Makar Sankranti 2026 : शुभ कार्यांत वर्ज्य असलेला हा रंग मकर संक्रांतीलाच का ठरतो विशेष? जाणून घ्या, महत्त्व

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number