Somavati Amavasya : ‘सोमवती अमावस्या’ 15 जूनला; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व आणि पितृदोष निवारणाचे उपाय

हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे, त्यातही ही तिथी सोमवारी आल्यास तिला 'सोमवती अमावस्या' म्हणून ओळखले जाते. यंदा ही तिथी अधिक मासात आल्याने दुर्मीळ योग तयार होत आहे.

Somavati Amavasya : ‘सोमवती अमावस्या’ 15 जूनला; जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व आणि पितृदोष निवारणाचे उपाय

Somavati Amavasya : हिंदू धर्मात अमावस्या तिथीला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे, त्यातही ही तिथी सोमवारी आल्यास तिला 'सोमवती अमावस्या' म्हणून ओळखले जाते. ज्योतिष शास्त्रानुसार, 2026 मधील ज्येष्ठ महिन्यातील ही अमावस्या 'अधिक मासात' आल्यामुळे तिचे धार्मिक महत्त्व कैक पटीने वाढले आहे. उदय तिथीच्या नियमांनुसार, यंदाची सोमवती अमावस्या सोमवार, 15 जून 2026 रोजी आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, भगवान शिव-पार्वतीची पूजा आणि दानाचे कार्य केल्यास अनंत पटीने पुण्य फळ मिळते, अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे. या दुर्मिळ योगावर पुण्यप्राप्तीसाठी भाविकांनी करण्याचे विधी, पूजन, दानासंबंधी जाणून घेऊ.

अमावस्या तिथीची शुभ वेळ आणि मुहूर्त
पंचांगानुसार, ज्येष्ठ अधिक मासाच्या या अमावस्या तिथीचा प्रारंभ रविवार, 14 जून 2026 रोजी दुपारी 12:19 वाजता (काही गणनेनुसार 12:20 वाजता) होणार आहे. तर या तिथीची समाप्ती सोमवार, 15 जून 2026 रोजी सकाळी 08:23 वाजता (किंवा 08:24 वाजता) होईल. हिंदू धर्मात उदय तिथीला प्राधान्य दिले जात असल्याने 15 जून रोजीच सोमवती अमावस्येचे उपवास आणि सर्व धार्मिक विधी केले जातील.

सुखद वैवाहिक जीवनासाठी व्रत आणि पूजा पद्धत
सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची संयुक्त पूजा करण्याची पुरातन परंपरा आहे. असे केल्याने पती-पत्नीच्या वैवाहिक जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि नात्यात गोडवा टिकून राहतो, अशी मान्यता आहे. या दिवशी घरातील देवघरात किंवा शिवालयात जाऊन महादेवाला जल, चंदनाचा लेप आणि बेलपत्र अर्पण करावे. तसेच शंकराला खिरीचा नैवेद्य दाखवावा. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी या दिवशी पूर्वजांचे स्मरण करून तर्पण व श्राद्ध विधी करणे अत्यंत फलदायी मानले जाते. अधिक मासातील सोमवती अमावस्येला पितृ दोष निवारणासाठी पिंडदान, तर्पण, आणि काळ्या तिळाचे दान करावे.

पुण्यप्राप्तीसाठी हे उपाय करावेत
– गंगास्नान: पवित्र नदीत किंवा घरीच अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे. 
– पिंपळ पूजा: पिंपळाच्या वृक्षाला जल अर्पण करून त्याला प्रदक्षिणा घालावी.
– दानधर्म: आपल्या आर्थिक सामर्थ्यानुसार गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा वस्तूंचे दान करावे.

हेही वाचा – Adhik Maas Amavasya 2026: अधिक ज्येष्ठ मासाची अमावस्या! तब्बल 3 वर्षांनी जुळून आला महासंयोग; भोलेनाथांच्या कृपेने 5 राशींचे भाग्य उजळणार

पितृ दोषाच्या शांतीसाठी खालील उपाय प्रभावी ठरतात
1. पितरांचे श्राद्ध आणि तर्पण
या दिवशी नदीकाठी किंवा घरात पितरांचे स्मरण करून श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करावे. पूर्वजांच्या नावाने काळे तीळ पाण्यात मिसळून तर्पण द्यावे. यामुळे पितरांच्या आत्म्याला शांती मिळते.  पितृ कार्याशी संबंधित हे विधी (पिंडदान, श्राद्ध) विधी शक्यतो मध्यान्ह काळात (दुपारी) करावेत.
2. पिंपळाची पूजा व परिक्रमा
पिंपळाच्या झाडामध्ये पितरांचा वास मानला जातो. सोमवारी दुपारी पिंपळाच्या मुळास पाणी अर्पण करावे. 'ओम नमो भगवते वासुदेवाय' मंत्राचा जप करत पिंपळाला किमान 7 ते 108प्रदक्षिणा घालाव्यात. 
3. अन्नदान आणि दानधर्म
सोमवती अमावस्येला काळे तीळ, तांदूळ, वस्त्र आणि फळे यांचे दान गरजू किंवा ब्राह्मणाला करावे. कोणत्याही पशू-पक्ष्याला त्रास देऊ नका. गायीला हिरवा चारा आणि कावळा, कुत्रा यांना पोळी किंवा अन्न आवर्जून द्यावे. स्नानानंतर गाय, कावळा, व कुत्र्याला अन्न देणे अत्यंत फलदायी मानले जाते.
4. शिव-पार्वती पूजा
सोमवार हा भगवान शंकराचा वार असल्याने या दिवशी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगावर जलाभिषेक आणि रुद्राभिषेक करावा. माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा केल्याने पितरांना सद्गती प्राप्त होते आणि घरात सुख-समृद्धी नांदते.

हेही वाचा – Navpancham Rajyog 2026: 15 दिवसांनी चमकणार 'या' 4 राशींचं नशीब! शनी-शुक्राच्या विशेष राजयोगामुळे आयुष्यात होणार मोठे बदल 

(Disclaimer : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number