Tender coconut : शहाळं घेताना तुमची फसवणूक होते? भरपूर पाणी आणि गोडवा ओळखण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

इतर कोणत्याही कृत्रिम थंड पेयांपेक्षा शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. पण, अनेकदा विकत घेतलेलं शहाळं आतून रिकामं निघतं किंवा बेचव असतं. अशी टाळा फसवणूक...

Tender coconut : शहाळं घेताना तुमची फसवणूक होते? भरपूर पाणी आणि गोडवा ओळखण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

Water Rich Tender Coconut : शरीरातील पाण्याची ठेवण्यासाठी उन्हाळ्यात नारळपाणी हा सर्वात उत्तम आणि नैसर्गिक आरोग्यदायी पर्याय आहे. इतर कोणत्याही कृत्रिम थंड पेयांपेक्षा शहाळ्याचे पाणी आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. मात्र, अनेकदा बाजारातून विकत घेतलेलं शहाळं आतून रिकामं निघतं किंवा चवीला बेचव असतं. जर तुम्हालाही गोड आणि भरपूर पाणी असलेलं शहाळं निवडताना अडचण येत असेल, तर खालील काही सोप्या युक्त्या तुम्हाला नक्कीच मदत करतील.

रंग आणि बाह्य स्वरूपावरून ओळखा ताजेपणा
– शहाळं निवडताना त्याचा रंग सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतो. नारळ खरेदी करताना त्याचा रंग गडद हिरवा किंवा फिकट पिवळसर असावा.
– ज्या शहाळ्यावर जास्त तपकिरी डाग असतील किंवा जे दिसायला खूप जुने वाटत असेल, ते घेणं टाळा.
– जास्त डाग असलेले शहाळे जुने असू शकते आणि त्यातील पाणी चवीला खराब लागण्याची शक्यता असते.

वजन आणि आवाजाची चाचणी
नारळात किती पाणी आहे हे जाणून घेण्यासाठी ते हातात घेऊन त्याचे वजन तपासा. नेहमी जड वाटणारे शहाळेच निवडावे, कारण वजनाला हलके असलेल्या नारळातील पाणी सुकलेले असू शकते. एक सोपी ट्रिक म्हणजे, शहाळं कानाजवळ नेऊन ते हलवून पाहा. जर पाणी हलल्याचा स्पष्ट आणि पूर्ण भरल्यासारखा आवाज आला, तर समजावे की ते पाण्याने पूर्ण भरलेले आहे. जर शहाळे वजनाला हलके असेल आणि आवाज येत नसेल, तर त्यात पाणी कमी असण्याची शक्यता असते.

हेही वाचा – Kairichi Dal Recipe : उन्हाळ्यात बनवा सोपी आणि झटपट आंबट गोड कैरीची डाळ

शहाळ्याचा आकार आणि शहाळ्याच्या 'डोळ्यांची' ट्रिक
शहाळ्याच्या आकारावरूनही त्यातील पाण्याचा अंदाज लावता येतो. जाणकारांच्या मते, पूर्ण गोल आकाराच्या शहाळ्यापेक्षा शंकूच्या आकाराचे (Conical) शहाळे निवडणे केव्हाही चांगले, कारण अशा नारळात मलई (Cream) कमी आणि पाणी जास्त असते. तसेच, शहाळ्यावर 3 गोलाकार खुणा असतात, ज्यांना नारळाचे 'डोळे' म्हटले जाते. हे डोळे हलके दाबून तपासा; जर ते मऊ किंवा थोडे ओले वाटले, तर समजावे की, त्यातील पाणी अतिशय गोड आहे.

शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी सर्वोत्तम पर्याय
बाहेर प्रवास करणाऱ्या लोकांसाठी किंवा उष्णतेचा त्रास होणाऱ्यांसाठी नारळपाणी हे अमृतासमान आहे. योग्य शहाळं निवडल्यास तुम्हाला केवळ चविष्ट पाणीच मिळत नाही, तर शरीराला आवश्यक असणारी खनिजेही भरपूर प्रमाणात मिळतात. त्यामुळे पुढच्या वेळी शहाळं घेताना या टिप्स नक्की आठवा, जेणेकरून तुमचे पैसे वाया जाणार नाहीत आणि तुम्हाला ताजे, गोड पाणी मिळेल.

हेही वाचा – Malai Cham Cham Recipe: बंगाली स्टाइल मलाई चमचम आता घरच्या घरी बनवा; मऊ, रसाळ आणि एकदम परफेक्ट 

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी जाणकारांचा सल्ला घ्यावा.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number