Uddhav Thackeray: ‘…तर आता हिंदू गप्प बसणार नाही’; उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये; हिंदुत्व धोक्यात असल्याचा दावा करत पुकारलं राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन

महिनाभरात लागोपाठ बसणाऱ्या या धक्क्यांमुळे बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाला सावरण्यासाठी आता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

Uddhav Thackeray: ‘…तर आता हिंदू गप्प बसणार नाही’; उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये; हिंदुत्व धोक्यात असल्याचा दावा करत पुकारलं राज्यव्यापी रामरक्षा आंदोलन

Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाला गेल्या काही दिवसांत लागलेली फुटीची गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. आधी पक्षाचे 6 खासदार फुटून शिंदे गटात सामील झाले, आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे नेते सचिन अहिर यांनीही पक्षाला रामराम ठोकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. महिनाभरात लागोपाठ बसणाऱ्या या धक्क्यांमुळे बॅकफूटवर गेलेल्या ठाकरे गटाला सावरण्यासाठी आता स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी थेट मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा आक्रमक अजेंडा हाती घेतला असून अयोध्या राम मंदिरातील कथित आर्थिक अपहाराच्या मुद्द्यावरून थेट भाजपला अंगावर घेण्याची तयारी केली आहे.

भाजपच्या हिंदुत्वावर थेट निशाणा
याच रणनीतीचा भाग म्हणून उद्धव ठाकरे यांनी राज्यव्यापी ‘राम रक्षा आंदोलना’चे बिगुल फुंकले आहे. या आंदोलनाची घोषणा करताना त्यांनी भाजपवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. 1990 च्या दशकातील अटलबिहारी वाजपेयी यांच्या विधानाचा संदर्भ देत ठाकरे म्हणाले, “त्या काळात वाजपेयी म्हणाले होते की ‘अब हिंदू मार नही खायेगा’, पण आज भाजपच्या राजवटीतील परिस्थिती पाहता मी ठणकावून सांगतोय की, ‘अब हिंदू माफ नही करेगा’.” राम मंदिरातील कथित चोरी आणि दानाच्या नावावर झालेली लूट हिंदू समाज कधीही सहन करणार नाही, असा इशारा देत त्यांनी तमाम शिवसैनिकांना आणि रामभक्तांना या आंदोलनात उतरण्याचे आवाहन केले आहे.

हेही  वाचा – Assembly Special Session Adjourned: पावसाचा फटका विधानसभा विशेष बैठकीला; मंत्री गैरहजर, दोनवेळा कामकाज तहकूब

5 जुलैला दादरमधून आंदोलनाचा शंखनाद
या नव्या संघर्षाची सुरुवात येत्या रविवारी, 5 जुलै रोजी संध्याकाळी 5 वाजता मुंबईतील दादर कबुतरखान्याजवळ असलेल्या हनुमान मंदिरापासून होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनासाठी खुले आमंत्रण दिले असून, “ज्यांनी हिंदुत्व आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले नाहीत, त्या प्रत्येक हिंदूने या आंदोलनात सहभागी व्हावे,” असे भावनिक आवाहन केले आहे. ज्यांना भाजपच्या काळात हिंदुत्व धोक्यात आल्याचे वाटते आणि मंदिरातील भ्रष्टाचार मान्य नाही, त्या सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. ठाकरेंच्या या थेट आव्हानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भाजपच्या गोटात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

राज्यभर आंदोलनाचा भडका उडणार; वारकऱ्यांनाही साद
उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले की, हे आंदोलन केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवले जाईल. “पूर्वी आम्ही हिंदूंना जागे करण्यासाठी महाआरती करत होतो, पण आता हिंदू पूर्णपणे जागा झाला असून तो सरकारला जाब विचारणार आहे. आम्ही या आंदोलनात राम रक्षा, हनुमान चालिसा आणि हनुमान स्तोत्राचे पठण करू,” असे त्यांनी नमूद केले. दादरमधील कार्यक्रम ही केवळ एक सुरुवात असून, आगामी काळात राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील, शहरातील आणि खेड्यातील राम-हनुमान मंदिरांमध्ये हे आंदोलन केले जाईल. तसेच सध्या सुरू असलेल्या आषाढी वारीचा संदर्भ देत, वारकरी संप्रदायही एकत्र येऊन भाजपला त्यांच्या कृत्याचा जाब विचारल्याशिवाय राहणार नाही, असा सज्जड दम ठाकरेंनी दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number