Bihar Election Results 2025 : जागा NDAने जिंकल्या, पण सर्वाधिक ‘मतं’ कोणत्या पक्षाला? बिहार निकालात पराजयानंतरही मतसंख्येत टॉपर

या निवडणुकीत जागांच्या बाबतीत भाजप (89 जागा) आणि जदयू (85 जागा) हे सर्वात मोठे पक्ष ठरले असले तरी, सर्वाधिक मतं (Highest Vote Share) मिळवणारा पक्ष मात्र वेगळाच आहे.

Bihar Election Results 2025 : जागा NDAने जिंकल्या, पण सर्वाधिक ‘मतं’ कोणत्या पक्षाला? बिहार निकालात पराजयानंतरही मतसंख्येत टॉपर

Bihar Election Results 2025 all Party Vote Share : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) 202 जागा जिंकून मोठा आणि अभूतपूर्व विजय मिळवला आहे. विरोधकांच्या महाआघाडीला अवघ्या 35 जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निवडणुकीत जागांच्या बाबतीत भाजप (89 जागा) आणि जदयू (85 जागा) हे सर्वात मोठे पक्ष ठरले असले तरी, सर्वाधिक मतं (Highest Vote Share) मिळवणारा पक्ष मात्र वेगळाच आहे. पराजय होऊनही मतसंख्येत आघाडीवर राहिल्यामुळे हा पक्ष चर्चेत आहे. 

सर्वाधिक मतं आरजेडीला, पण जागा कमी
बिहारमध्ये भाजपने 89 आणि जनता दलाने (संयुक्त) 85 जागा जिंकल्या, तर लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास) 19 उमेदवार विजयी झाले आहेत. राष्ट्रीय लोक मोर्चाला देखील चार जागांवर विजय मिळाला आहे. या पक्षांच्या ताकदीमुळे एनडीएने द्विशतक पूर्ण केले.
सर्वाधिक मतं: बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (RJD) सर्वाधिक 23 टक्के मतं मिळाली आहेत. मात्र, सर्वाधिक मतं मिळूनही RJD ला या निवडणुकीत केवळ 25 जागाच जिंकता आल्या आहेत. त्यामुळे तेजस्वी यादव यांचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले आहे.
याशिवाय, महाआघाडीतील पक्षांची कामगिरीही सुमारच राहिली आहे. महाआघाडीमधील पक्षांना 40 जागा देखील जिंकता आलेल्या नाहीत. राष्ट्रीय जनता दलाचे 25 तर, काँग्रेसचे केवळ सहा उमेदवार निवडून आले आहेत, ज्यामुळे काँग्रेसला एकेरी जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

हेही वाचा – Bihar Assembly Election 2025 : अवघ्या 27 मतांची झाले विजयी; बिहारमधील असे पाच निकाल ज्यांनी चुकवला उमेदवारांच्या हृदयाचा ठोका

लोजपाच्या मतांचे प्रभावीपणे जागांमध्ये रूपांतर
या निवडणुकीतील एक खास बाब म्हणजे, तेजस्वी यादव यांच्या RJD ला 23 टक्के मतं मिळाली, पण केवळ 25 जागा जिंकता आल्या. तर दुसरीकडे, चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टीने (रामविलास) केवळ 4.97 टक्के मतं मिळवली आहेत, मात्र या पाच टक्के मतांच्या जोरावर लोजपाने 19 जागा जिंकल्या आहेत. याचा अर्थ, लोजपाने कमी मतांचे जागांमध्ये प्रभावी रूपांतर केले.

एनडीएच्या विजयाची प्रमुख कारणे
एनडीएला हा अभूतपूर्व विजय मिळवून देण्यात अनेक घटकांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
सरकारी मदत: ऐन मतदानाच्या तोंडावर बिहारमधील 1.2 कोटी महिलांना देण्यात आलेली प्रत्येकी 10 हजार रुपयांची रोजगाराभिमुख मदत हा एक महत्त्वाचा घटक ठरला.
संघटित ताकद: मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मागे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) उभी केलेली संघटित ताकद निर्णायक ठरली.
विरोधी आघाडीचे अपयश: विसकळीत विरोधी आघाडी आणि राष्ट्रीय जनता दलाचे मुस्लीम-यादव मतपेढीचे (M-Y Equation) फसलेले गणित यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएने एकतर्फी विजय मिळवला.

हेही वाचा – Bihar Assembly Election 2025 : महिला ठरल्या ‘किंगमेकर!’; ज्यांना मतदान करतील तेच स्थापन करतायेत सत्ता, बिहार निवडणुकीतही तेच चित्र

जाणून घेऊ, आकडेवारीचा खेळ आणि कुणाला किती मते मिळाली..
1. राष्ट्रीय जनता दलाला    सर्वाधिक 1,15,46,055 मतांसह एकूण 23 टक्के मते मिळाली.
2. भारतीय जनता पक्ष 1,00,81,143 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यांना 20.8 टक्के मते मिळाली
3. जनता दल (संयुक्त) 96,67,118 मतांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्यांना 19.25 टक्के मते मिळाली.
4. काँग्रेसला चौथ्या क्रमांकाची 43,74,579 मते मिळाली. त्यांची मतांची टक्केवारी 8.71 आहे.
5. लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) केवळ 24,97,368 मतांसह पाचव्या क्रमांकावर राहिला. त्यांची मतांची टक्केवारी 4.97 आहे. मात्र, हा पक्ष एनडीएमध्ये असल्याने सत्तेत राहील. 
6. कम्युनिस्ट पार्टी (मार्क्स व लेनिनवादी) ला एकूण 14,25,592 मते मिळाली. ही 2.84 टक्के मते आहेत.
7. एमआयएमला 9,30,504 मते मिळाली. ही टक्केवारीमध्ये 1.85 इतकी आहेत.
8. नोटा 9,10,730 मते मिळाली. ही पण टक्केवारी 1.81 एवढी असून ती लक्षणीय आहे.
9. बसपाला नोटापेक्षाही कमी मते मिळाली. त्यांना 8,13,583 मते मिळाली. ही टक्केवारीत 1.62 एवढी आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number