Solapur MLC Election: सोलापूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांच्या जन्मतारखेवर आक्षेप, तर बोगस सह्यांचा ‘रासप’ उमेदवाराला फटका

भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार रमेश बारसकर यांनी आक्षेप नोंदवत निवडणूक प्रक्रियेत नवे वळण आणले आहे.<br/>

Solapur MLC Election: सोलापूरमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! भाजप उमेदवार राजेंद्र राऊतांच्या जन्मतारखेवर आक्षेप, तर बोगस सह्यांचा ‘रासप’ उमेदवाराला फटका

Solapur MLC Election: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्जांच्या छाननीदरम्यान अनेक वाद समोर येत आहेत. पुण्यातील घडामोडींनंतर आता सोलापूरमध्येही अर्जाच्या वैधतेवरून राजकीय वातावरण तापले आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार रमेश बारसकर यांनी आक्षेप नोंदवत निवडणूक प्रक्रियेत नवे वळण आणले आहे.

राजेंद्र राऊत यांच्या अर्जावर अनेक आक्षेप

बारसकर यांनी सादर केलेल्या हरकतीनुसार, राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी अर्जात जन्मतारखेची चुकीची नोंद केल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच, 2019 ते 2024 या कालावधीत आमदार म्हणून मिळालेल्या शासकीय निवासस्थानासंदर्भातील काही माहिती अर्जात नमूद करण्यात आलेली नसल्याचा आरोपही करण्यात आला आहे. नावासमोर ‘श्री’ हा शब्द वापरल्याबाबतही हरकत घेण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यांवर निवडणूक निर्णय अधिकारी एस. कार्तिकेयन यांच्यासमोर सुनावणी पार पडली असून अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे.

बोगस स्वाक्षऱ्यांमुळे उमेदवारी अर्ज फेटाळला

सोलापूरमधील आणखी एका प्रकरणाने निवडणूक प्रक्रियेत खळबळ उडवली आहे. ‘न्यू राष्ट्रीय समाज पक्ष’चे उमेदवार अशोक वाघमोडे यांच्या अर्जात गंभीर अनियमितता आढळल्याने त्यांची उमेदवारी बाद करण्यात आली. अर्जासोबत जोडलेल्या 10 नगरसेवकांच्या सूचक आणि अनुमोदक म्हणून दाखवलेल्या स्वाक्षऱ्या बनावट असल्याचा आरोप करण्यात आला होता. संबंधित नगरसेवकांनी आक्षेप घेतल्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी वाघमोडे यांना अनेकदा सुनावणीसाठी बोलावले, मात्र ते उपस्थित राहिले नाहीत. परिणामी, निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला.

धाराशिव-बीड-लातूरमध्ये सर्व अर्ज वैध; थेट लढतीची शक्यता

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मात्र छाननी प्रक्रिया सुरळीत पार पडली आहे. येथे दाखल झालेल्या सर्व 14 उमेदवारी अर्जांना वैधता मिळाली असून निवडणुकीच्या रिंगणात सध्या 9 उमेदवार कायम आहेत. महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी 4 अर्ज दाखल केले होते, तर काँग्रेसचे महेश देशमुख आणि अर्चना गंगणे यांनी प्रत्येकी 2 अर्ज सादर केले होते. इतर सर्व उमेदवारांचे अर्जही मंजूर झाल्याने आता अर्ज माघारीच्या प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर बसवराज पाटील आणि महेश देशमुख यांच्यात थेट सामना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Pune MLC Election Controversy: पुण्याच्या राजकारणात मोठा पेच; 'या' एका कागदामुळे विक्रम काकडेंची उमेदवारी धोक्यात?

सांगली-सातारामध्येही उमेदवारीवरून वाद

सांगली-सातारा मतदारसंघातही छाननीदरम्यान एका अपक्ष उमेदवाराच्या अर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्या बाजूने अपक्ष उमेदवार किशोर धुमाळ यांच्या अर्जाविरोधात हरकत घेण्यात आली आहे. धुमाळ यांनी सूचक आणि अनुमोदकांच्या कथित बनावट स्वाक्षऱ्या जोडून अर्ज दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाची तपासणी सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांनी अंतिम निर्णय अद्याप राखून ठेवला आहे. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणुकीचे समीकरण नेमके काय राहणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number