Heatstroke Deaths: राज्यात उन्हाचा कहर! उष्माघाताने तिघांचा मृत्यू; तर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या चिमुकलीचा ररस्त्यातच तडफडून अंत

प्रशासनाकडून या सर्व मृत्यूंचे प्राथमिक कारण 'उष्माघात' असण्याचा प्रबळ संशय व्यक्त केला जात आहे. वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.<br/>

Heatstroke Deaths: राज्यात उन्हाचा कहर! उष्माघाताने तिघांचा मृत्यू; तर पाण्यासाठी पायपीट करणाऱ्या चिमुकलीचा ररस्त्यातच तडफडून अंत

Heatstroke in Maharashtra: संपूर्ण राज्यामध्ये सध्या उन्हाचा कडाका असह्य झाला असून तापमानाने नवीन उच्चांक गाठला आहे. या भीषण उष्णतेच्या लाटेचा मोठा फटका जनजीवनाला बसला असून नागपूर, लातूर आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मृत्यूच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. प्रशासनाकडून या सर्व मृत्यूंचे प्राथमिक कारण 'उष्माघात' असण्याचा प्रबळ संशय व्यक्त केला जात आहे. वाढत्या पाऱ्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

भीषण पाणीटंचाईमुळे 6 वर्षीय चिमुकलीचा अंत
यवतमाळच्या नेर तालुक्यातील अजंती पारधी बेडा गावात एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. अनवी अनाडी भोसले ही 6 वर्षांची चिमुकली भीषण उन्हात पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट करत असताना रस्त्यातच चक्कर येऊन पडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने प्रशासकीय नियोजनाचे वाभाडे काढले आहेत. सुमारे 350 लोकवस्तीच्या या गावात दर 8 दिवसाआड पाणीपुरवठा होतो. घरासमोर नळ असूनही त्यात केवळ हवा येत असल्याने या निरागस जीवाला पाण्यासाठी भटकंती करावी लागली, अशी संतप्त भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

नागपुरात उन्हाचा तडाखा; 3 वृद्धांचा मृत्यू
राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरातही उन्हाचा तडाखा जीवघेणा ठरत आहे. शहराच्या विविध भागांत 3 वृद्ध व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली. यामध्ये सदर परिसरातील 58 वर्षीय पुरुष, यशोधरानगरमधील 60 वर्षीय पुरुष आणि गणेशपेठ येथील आस्था निवाऱ्यातील 65 वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. या तिघांनाही तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हे तिन्ही मृत्यू उष्माघातामुळेच झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तवला आहे.

शेतातून परतताना मजुराचा मृत्यू
दरम्यान, लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील भुसनी गावातही उन्हाने एकाचा बळी घेतला आहे. लक्ष्मण कांबळे या 55 वर्षीय मजुराचा शेतात काम करून घरी परतत असताना कडाक्याच्या उन्हामुळे जागीच मृत्यू झाला. कडाक्याचे ऊन आणि शारीरिक कष्ट यामुळे त्यांना चक्कर आली आणि त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे मजुरांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा – Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण' योजनेत सरकारची मोठी कारवाई; ई-केवायसीच्या चाळणीत 54 लाख अर्ज बाद, आता या महिलांना…

आरोग्य विभागाचे आवाहन आणि खबरदारी
वाढत्या तापमानाचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने नागरिकांना विशेष काळजी घेण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी, विशेषतः सकाळी 12 ते दुपारी 4 या काळात विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे, टोपी किंवा रुमालाचा वापर करावा आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या सर्व संशयित मृत्यूंचा नेमका अहवाल शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number