India slams Pakistan at UN : ‘फितना अल-हिंदुस्तान’ शब्दप्रयोगावर संयुक्त राष्ट्रात भारताचा तीव्र आक्षेप; ‘पाकिस्तानी लष्कराची हुकूमशाही आणि स्वतःचे अपयश लपवण्यासाठीच..’

पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या या मानसिकतेवर कडक प्रहार करताना राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी तेथील अंतर्गत परिस्थितीवर बोट ठेवले. तसेच, भारतावर खापर फोडण्यावरून तीव्र निषेध व्यक्त केला.

India slams Pakistan at UN : ‘फितना अल-हिंदुस्तान’ शब्दप्रयोगावर संयुक्त राष्ट्रात भारताचा तीव्र आक्षेप; ‘पाकिस्तानी लष्कराची हुकूमशाही आणि स्वतःचे अपयश लपवण्यासाठीच..’

Harish Parvathaneni Exposes Pakistan at UN : संयुक्त राष्ट्रात (UN) भारताने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दुटप्पी आणि दहशतवादी धोरणांचा बुरखा फाडला आहे. पाकिस्तान सरकारने आपल्या गुप्तचर संस्था आणि सुरक्षा दलांना बलुचिस्तानमधील दहशतवादी गटांचा उल्लेख अधिकृतपणे ‘फितना अल-हिंदुस्तान’ असा करण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानच्या या कुप्रसिद्ध आणि दिशाभूल करणाऱ्या मोहिमेचा भारताने जागतिक व्यासपीठावर तीव्र शब्दांत निषेध केला आहे. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी पाकिस्तानच्या या नव्या चालीला चोख प्रत्युत्तर देत तिथे सुरू असलेल्या छुपे लष्करी राजकारण आणि लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्या हुकूमशाहीवर थेट हल्ला चढवला आहे.

नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भारताविरोधातील द्वेषाचा वापर: पर्वतनेनी
पाकिस्तानी राज्यकर्त्यांच्या या मानसिकतेवर कडक प्रहार करताना राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी तेथील अंतर्गत परिस्थितीवर बोट ठेवले. ‘हा सर्व प्रकार पाकिस्तानच्या छुप्या लष्करी प्रभावातून अत्यंत नियोजनबद्ध रीतीने चालवल्या जाणाऱ्या द्वेषाचा संघटित परिणाम आहे. पाकिस्तानी नागरिकांना सतत भारताविरुद्ध शत्रुत्वाच्या छायेत आणि भीतीच्या वातावरणात ठेवणे, हाच या कुटिल नीतीमागचा मुख्य उद्देश आहे,’ असे पर्वतनेनी म्हणाले. असे केल्याने पाकिस्तानातील लष्करी हुकूमशहांना देशातील सत्ता आणि महत्त्वाच्या आर्थिक संसाधनांवर स्वतःचे नियंत्रण कायम राखता येते; तसेच देशातील मुख्य राजकीय आणि आर्थिक समस्यांवरून सामान्य जनतेचे लक्ष विचलित करणे त्यांना सोपे जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘फितना अल-हिंदुस्तान’ नामांतराला भारताचा तीव्र आक्षेप
पाकिस्तान सरकारने 2025 मध्ये बलुचिस्तान प्रांतात सक्रिय असलेल्या सर्व दहशतवादी संघटनांना अधिकृतपणे ‘फितना अल-हिंदुस्तान’ म्हणून घोषित केले होते. (याचा अर्थ भारताने पसरवलेली अराजकता, गोंधळ, फूट किंवा बंडाळी असा होतो.) या निर्णयाचा धिक्कार करताना भारताने स्पष्ट केले की, स्वतःच्या भूमीवर पाळलेल्या दहशतवादाला धार्मिक शब्दांच्या आडून लपवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. याशिवाय, पाकिस्तानकडून शेजारील अफगाणिस्तानवर करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यांचाही भारताने तीव्र शब्दांत निषेध केला. ‘दहशतवादविरोधी कारवाईच्या नावाखाली निष्पाप नागरिकांची हत्या करणे, महिला व मुलांना अपंग किंवा अनाथ करणे, याला कोणत्याही सुसंस्कृत जगात कायद्याचे राज्य म्हणता येत नाही,’ अशा कडक शब्दांत पर्वतनेनी यांनी पाकिस्तानची कोंडी केली.

हेही वाचा – PoK Violence : पाकव्याप्त काश्मीर पेटले! जून 9 च्या बंदपूर्वी सुरक्षा दले आणि आंदोलकांमध्ये रक्तरंजित संघर्ष; 11 ठार तर 70 हून अधिक जखमी

27 व्या घटनादुरुस्तीच्या आडून लष्कराचा सत्तापालट
भारताने पाकिस्तानातील अंतर्गत लोकशाहीचा खून करून सुरू असलेल्या लष्करी सत्तापालटाचा संदर्भ जाहीरपणे दिला. पर्वतनेनी यांचा रोख थेट असीम मुनीर यांच्याकडे होता, ज्यांची 5 वर्षांच्या कार्यकाळासाठी देशाचे पहिले ‘चीफ ऑफ डिफेन्स फोर्सेस’ (CDF) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संरक्षण क्षेत्रातील सर्व आदेशांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि जलद निर्णय घेण्याच्या नावाखाली पाकिस्तानात 27 वी घटनादुरुस्ती मंजूर करून सीडीएफ हे नवीन शक्तिशाली पद निर्माण करण्यात आले आहे. या नव्या रचनेमुळे पाकिस्तानात पूर्णपणे लष्कराची हुकूमशाही प्रस्थापित झाली असल्याचे भारताने जगाला दाखवून दिले.

शेजाऱ्यांवर खापर फोडण्याची जुनी सवय यशस्वी होणार नाही
आपल्या भाषणाचा शेवट करताना राजदूत हरीश पर्वतनेनी यांनी पाकिस्ताला त्यांच्या मर्यादांची जाणीव करून दिली. “पाकिस्तानला स्वतःच्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अपयशाचे खापर नेहमीच शेजारील देशांवर, विशेषतः भारतावर फोडण्याची एक जुनी आणि वाईट सवय आहे. जागतिक स्तरावर दिशाभूल करणारी माहिती पसरवण्याचे त्यांचे हे मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी घालणे बंद करून स्वतःच्या कोसळणाऱ्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावे, असा सल्लाही या माध्यमातून देण्यात आला.

हेही वाचा – India Fuel Reserves: आखाती देशांतील युद्ध भडकल्यास वाढणार भारताची चिंता? इंधनाच्या साठ्याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली मोठी अपडेट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number