Gunratna Sadavarte: ‘सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा पुळका कशासाठी? स्वतः उपोषणाला बसा…’; गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर निशाणा

सदावर्ते यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अभ्यासावर आणि राजकीय भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Gunratna Sadavarte: ‘सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा पुळका कशासाठी? स्वतः उपोषणाला बसा…’; गुणरत्न सदावर्तेंचा राज ठाकरेंवर निशाणा

Gunratna Sadavarte: दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर, एसटी कामगार संघटनेचे नेते ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे पिता-पुत्रांवर शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील गोंधळावरून आणि विद्यार्थ्यांच्या भावनांचा गैरवापर करून देशात केवळ 'इमोशनल ब्लॅकमेलिंग' सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. सदावर्ते यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अभ्यासावर आणि राजकीय भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, मनसेचे अमित ठाकरे यांच्यावरही अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे.

संविधानाला आव्हान देणाऱ्यांना न्यायालयात खेचणार: सदावर्तेंचा इशारा
दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेले उपोषण म्हणजे देशाच्या व्यवस्थेला वेठीस धरण्याचा प्रकार असल्याचे सदावर्ते म्हणाले. यापूर्वी महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणादरम्यान उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा दाखला देत, त्यांनी आता दिल्ली उच्च न्यायालयातही याचिका दाखल झाल्याची माहिती दिली. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला असला, तरी मरेपर्यंत उपोषण करण्याची परवानगी भारतीय संविधान देत नाही. सोनम वांगचुक स्वतःला संविधानापेक्षा मोठे समजतात का, असा सवाल करत त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवर (CBI) विश्वास का ठेवला जात नाही, अशी विचारणा केली. तसेच, कायदा आणि सुव्यवस्थेचे उल्लंघन करणाऱ्या या आंदोलनाच्या समर्थनात मनसे उतरल्याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

राज ठाकरेंच्या राजकीय परिपक्वतेवर प्रश्नचिन्ह; उपोषणाला बसण्याचे आव्हान
नीट (NEET) पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणांचा तपास कायदेशीर यंत्रणा करत असताना, राज ठाकरे आणि सोनम वांगचुक यांना तपास अधिकारी नेमायचे का, असा टोला सदावर्ते यांनी लगावला. राज ठाकरेंना या विषयातील काय समजते, अशी विचारणा करत मनसे आता केवळ प्रसिद्धीसाठी 'वाजंत्री' वाजवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईत या मुद्द्यावर मोर्चा काढण्याची तयारी करणाऱ्या राज ठाकरेंनी वांगचुक यांच्या ऐवजी स्वतः कोणत्याही राजकीय लाभाशिवाय उपोषणाला बसून दाखवावे, असे आव्हान त्यांनी दिले. टीईटी (TET) परीक्षेसारख्या स्थानिक मुद्द्यांवर बोलण्याऐवजी राज ठाकरे केवळ कौटुंबिक पक्ष चालवत असून, त्यांचे अस्तित्व आता काही प्रभागांपुरतेच मर्यादित राहिल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – NCP: पार्थला मंत्रीपदासाठी सुनेत्रा पवारांकडे शिफारस, पटेल-तटकरेंचा विरोध? फडणवीसांच्या भेटीत थेट तक्रार?

अमित ठाकरेंच्या विधानाची उडवली खिल्ली
मनसे नेते अमित ठाकरे यांनी या आंदोलनाला पाठिंबा देताना केलेल्या एका वक्तव्याचा समाचार सदावर्ते यांनी घेतला. आंदोलनाला पाठिंबा आहे, पण संबंधित कार्यकर्त्याला नाही, या अमित ठाकरेंच्या भूमिकेवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. अशा गोंधळलेल्या विधानांमुळे लोकांमध्ये मनसेची हसे होत असल्याची टीका त्यांनी केली. राजकारणातील प्राथमिक गोष्टी समजण्यापूर्वीच मोठी विधाने करणाऱ्यांना जनता कधीही गांभीर्याने घेत नाही, असा टोला त्यांनी अमित ठाकरेंचे नाव न घेता लगावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number