Gulabrao Patil Shows Displeasure at Center : राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारवर जाहीरपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील पाण्याशी संबंधित काही महत्त्वाच्या योजनांना केंद्राकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. अनेक योजना केवळ निधीअभावी रखडल्या असून, केंद्राने हात आखडता घेतल्यामुळे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणारी मदत थांबली असल्याचे पाटील म्हणाले.
केंद्राच्या भूमिकेवर नाराजी
केंद्र सरकारकडून राज्याला मिळणारी मदत वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आमच्या चालू असलेल्या योजना बंद झाल्या आहेत आणि केंद्राकडून कोणतीही ठोस मदत मिळत नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपली व्यथा मांडली. राज्याच्या हक्काचा निधी रोखल्यामुळे विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याचे म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.
हेही वाचा – Rohit Pawar: ‘जनता सत्तेबाहेर हाकलल्याशिवाय राहणार नाही…’; बंगालमधील विजयावरून रोहित पवारांचा भाजपवर निशाणा
प्रशासकीय अडचणींचा पाढा
गुलाबराव पाटील यांनी पुढे असेही स्पष्ट केले की, तांत्रिक आणि प्रशासकीय कारणांमुळे केंद्राकडे पाठवलेले प्रस्ताव प्रलंबित आहेत. राज्याने अनेकदा विनंती करूनही केंद्राकडून प्रतिसाद मिळत नसल्याने लोकांची कामे करण्यात अडचणी येत असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या पाणीपुरवठा योजनांच्या संदर्भात त्यांनी केंद्राच्या उदासिन भूमिकेवर नाराजी व्यक्त केली असून, पुढे पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.