सर्व निमलष्करी दलांच्या सुट्या रद्द; आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट

लष्कराने दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. आता या कारवाईनंतर सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून ही मोठी बातमी येत आहे.

सर्व निमलष्करी दलांच्या सुट्या रद्द; आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट
Edited Image

नवी दिल्ली: भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर कारवाई केली आहे. लष्कराने दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. आता या कारवाईनंतर सर्व निमलष्करी दलांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून ही मोठी बातमी येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गृहमंत्री अमित शाहा यांनी सर्व निमलष्करी दलांच्या महासंचालकांना सीमेवर पूर्णपणे सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय सीमेवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या देशभरात मॉक ड्रिलची तयारीही सुरू आहे.

ऑपरेशन सिंदूरच्या घटनेनंतर उत्तर प्रदेशात रेड अलर्ट – 

दरम्यान, ऑपरेशन सिंदूरच्या घटनेनंतर संपूर्ण उत्तर प्रदेशात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. यूपीचे डीजीपी प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय, सुरक्षेचा विचार करून, त्यांनी यूपी पोलिसांसह इतर संरक्षण तुकड्यांना सुरक्षा मजबूत करण्याचे निर्देश दिले आहेत. या हल्ल्यानंतर पाकिस्ताननेही भारतानेच हा हल्ला केल्याचे मान्य केले. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी रात्री आपत्कालीन बैठक बोलावली. भारताच्या हल्ल्याला पाकिस्तान प्रत्युत्तर देईल, असेही त्यांनी म्हटले आहे. 

हेही वाचा – श्रीनगर विमानतळावर हवाई वाहतूक ठप्प; भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सुरक्षा वाढवली

भारताचे ऑपरेशन सिंदूर – 

भारतीय सैन्याने बुधवारी रात्री 1:28 वाजता ऑपरेशन सिंदूर सुरू केले. याअंतर्गत, लाहोरमधील दहशतवादी हाफिज सईद आणि बहावलपूरमधील दहशतवादी मसूद अझहरचे अनेक अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले. भारतीय सैन्याने पीओकेमधील मुझफ्फराबाद, धामोल, कोटली आणि बाग तळांवरही हल्ला केला. 

हेही वाचा – Operation Sindoor Inside Story : PM मोदींनी मंजुरी दिली; पण हल्ल्याचा अंतिम निर्णय 'या' व्यक्तीने घेतला

लष्कर आणि जैशचे सुमारे 30 दहशतवादी ठार – 

दरम्यान, भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात लष्कर आणि जैशचे सुमारे 30 दहशतवादी मारले गेले. त्याच वेळी, पंतप्रधान मोदी ऑपरेशन सिंदूरवर सतत लक्ष ठेवून होते. पंतप्रधान मोदी सुरुवातीपासूनच रात्रभर ऑपरेशनवर लक्ष ठेवून होते. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number