Gopichand Padalkar : ‘रोहित पवारांचे पंढरपुरातील आंदोलन म्हणजे केवळ ॲक्टिंग’; पडळकरांचा हल्लाबोल, ‘त्यांनी आणि त्यांच्या आजोबांनीच..’

रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या अटींविरोधात पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून टीका केली आहे.

Gopichand Padalkar : ‘रोहित पवारांचे पंढरपुरातील आंदोलन म्हणजे केवळ ॲक्टिंग’; पडळकरांचा हल्लाबोल, ‘त्यांनी आणि त्यांच्या आजोबांनीच..’

Gopichand Padalkar criticizes Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या अटींविरोधात पंढरपुरात सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कडाडून टीका केली आहे. पडळकर सांगलीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, रोहित पवारांचे हे आंदोलन केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी सुरू असलेले नाटक आहे. त्यांना चित्रपटासारखी चांगली ॲक्टिंग करता येते, असा टोला लगावत पडळकरांनी 'हे काय कोणत्या सिनेमाचे शूटिंग चालू आहे का?' असा खोचक सवाल केला. रोहित पवारांचे हे उपोषण गांभीर्याने न घेऊ नये. तो केवळ देखावा असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोलापूर पोलीस प्रमुखांकडे अनोखी मागणी आणि पोलिसांना आवाहन
या आंदोलनाचा खरपूस समाचार घेताना पडळकरांनी सोलापूर जिल्हा पोलीस प्रमुखांकडे (SP) एक अतिशय उपरोधिक मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, पोलिसांनी रोहित पवारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करावी आणि त्यांना सुरक्षेच्या वेढ्यात ठेवून अन्नाचा एक घासही खाऊ देऊ नये. केवळ बातम्यांमध्ये चमकण्यासाठी हे आंदोलन नसेल आणि जर त्यांना खरोखरच काळजी असेल, तर त्यांनी 1 ते 2 महिने सलग उपोषणाला बसले पाहिजे. रोहित पवारांचे हे नाटक उघडे पाडण्यासाठी पोलिसांनी त्यांना अन्न मिळण्यापासून रोखावे, अशी मागणी त्यांनी केली.

हेही वाचा – Chhagan Bhujabl on Tukaram Mundhe : मुंढेंच्या धडक कारवाईवर भुजबळांचे वक्तव्य; फोनवर झाली महत्त्वाची चर्चा,जाणून घ्या काय म्हणाले?

शेतकऱ्यांची लूट केल्याचा गंभीर आरोप आणि एफआरपीचा मुद्दा
गोपीचंद पडळकर यांनी यावेळी रोहित पवार आणि त्यांच्या कुटुंबीयांवर शेतकऱ्यांची आर्थिक लूट केल्याचा गंभीर आरोप केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खळे सगळ्यात जास्त रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनीच लुटले आहे, अशी जळजळीत टीका त्यांनी केली. केवळ 6 कोटी रुपयांवरून सुरू करून आज त्यांनी 100 ते 200 कोटी रुपयांचे साखर कारखाने कसे उभे केले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यातील साखर कारखानादारांकडून शेतकऱ्यांना जोपर्यंत रास्त आणि किफायतशीर भाव म्हणजेच एफआरपी (FRP) मिळत नाही, तोपर्यंत रोहित पवारांनी हे अन्नत्याग आंदोलन मागे घेऊ नये, असे थेट आव्हान त्यांनी दिले.

कर्जमाफीच्या अटींवरून रोहित पवारांचे पंढरपुरात उपोषण
दुसरीकडे, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 30 जूनपर्यंत 2,00,000 रुपयांपर्यंतची कर्जमाफी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या कर्जमाफी योजनेमध्ये सरकारने लागू केलेल्या काही अटींमुळे शेतकरी वंचित राहतील, असा दावा करत आमदार रोहित पवार यांनी पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सरकारने सर्व जाचक अटी रद्द कराव्यात आणि शेतकऱ्यांना 2,00,000 रुपयांची सरसकट कर्जमाफी द्यावी, या मुख्य मागणीसाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. याच आंदोलनावरून आता महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार राजकीय कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – Ramdas Athawale: 'काँग्रेसऐवजी आमच्या पक्षात या…'; रामदास आठवलेंची शरद पवारांना खुली ऑफर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number