Pradhya Satav Join BJP: काँग्रेसला रामराम! प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; म्हणाल्या, ‘देवाभाऊंच्या साथीने…’

प्रज्ञा सातव यांनी आज भापमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी भाजप नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते.

Pradhya Satav Join BJP: काँग्रेसला रामराम! प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; म्हणाल्या, ‘देवाभाऊंच्या साथीने…’

Pradhya Satav Join BJP : काँग्रेस नेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी आज भापमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी भाजप नेते, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित होते. आज आपल्या विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा देत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, यावेळी प्रज्ञा सातव यांनी भापच्या वरीष्ठ नेत्यांचे आभार मानत दिवंगत पती राजीव सातव यांनी पाहिलेलं विकासकामाचं स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांनी म्हटलं की, मला पक्षात सामावून घेतल्याबद्दल मी पक्षश्रेष्ठींचे खूप खूप आभार मानते. भाजपच्या नेतृत्वाखाली आता विकासकामे मार्गी लावण्यास आणखी बळ मिळेल, राजीव सातव यांचे आशीर्वाद आणि देवाभाऊंच्या साथीने प्रत्येक संकटावर मात करू, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

दरम्यान, डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज आपल्या विधान परिषदेतील सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला आहे. त्यांनी आपला राजीनामा विधानपरिषदेच्या विधीमंडळ सचिवांकडे औपचारिकरीत्या सुपूर्द केला. डॉ. सातव यांचा विधानपरिषदेतील कार्यकाळ 2030 पर्यंत असतानाही त्यांनी मुदतपूर्व राजीनामा दिला आहे. भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच त्यांनी आमदारकी सोडण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीमुळे हिंगोली जिल्ह्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले जात आहे.

हेही वाचा – Sanjay Raut: माणिकराव कोकाटे ही हिट विकेट, स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी अजित पवार… संजय राऊतांचा थेट आरोप

प्रज्ञा सातव कोण आहेत? 

डॉ. प्रज्ञा सातव या दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नी आहेत. राजीव सातव हे काँग्रेसमधील प्रभावी नेते मानले जात होते आणि गांधी कुटुंबाशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. 2021 मध्ये कोरोनाशी झुंज देताना त्यांचे निधन झाले होते. सध्या प्रज्ञा सातव या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळत होत्या. शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेवर 2021 साली डॉ. प्रज्ञा सातव यांची बिनविरोध निवड झाली होती. त्यानंतर 2024 मध्ये पुन्हा एकदा त्या काँग्रेसकडून विधानपरिषद सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ थेट 2030 पर्यंत होता.

हेही वाचा – Manikrao Kokate: राजकारणात भूकंप! कोकाटेंचा राजीनामा राज्यपालांकडे, पुढील निर्णय महत्त्वाचा

काँग्रेसच्या विचारसरणीशी दीर्घकाळ नाते असलेले सातव कुटुंब पक्षाशी निष्ठावंत मानले जाते. मात्र, प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे या पारंपरिक राजकीय समीकरणांना धक्का बसला असून, काँग्रेससाठी ही घडामोड मोठी राजकीय अडचण ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number