Maharashtra Monsoon Arrival: गुड न्यूज! 72 तासांत हवामान बदलणार; ‘या’ तारखेला मान्सून धडकणार महाराष्ट्रात

उन्हाच्या तीव्र चटक्यांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी अरबी समुद्रातून एक अतिशय दिलासादायक बातमी आली आहे.

Maharashtra Monsoon Arrival: गुड न्यूज! 72 तासांत हवामान बदलणार; ‘या’ तारखेला मान्सून धडकणार महाराष्ट्रात

Maharashtra Monsoon Arrival:  उन्हाच्या तीव्र चटक्यांनी हैराण झालेल्या नागरिकांसाठी अरबी समुद्रातून एक अतिशय दिलासादायक बातमी आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, मान्सून वेगाने पुढे सरकत असून येत्या 10 जूनपर्यंत तो महाराष्ट्रात अधिकृतपणे धडकण्याची शक्यता आहे. या काळात मुंबईसह राज्याच्या अनेक भागांत मुसळधार पावसाच्या सरी कोसळतील. मात्र, एकीकडे ही आनंदवार्ता असली, तरी हवामान विभागाने यंदाच्या पावसाच्या पॅटर्नबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा एक मोठा इशाराही दिला आहे.

पुढील 72 तास मुसळधार; किनारपट्टीला ताशी 60 ते 70 किमी वेगाने वादळाचा इशारा
मान्सून राज्यात येण्यापूर्वीच मान्सूनपूर्व (Pre-Monsoon) पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. विशेषतः कोकण किनारपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात सध्या वादळी वारे वाहत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 26 मे रोजी महाराष्ट्राच्या आकाशात मान्सूनचे ढग दाटून येतील. या दरम्यान ताशी 60 ते 70 किलोमीटर इतक्या प्रचंड वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. यामुळे पुढील 3 दिवस (72 तास) कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा (अलर्ट) देण्यात आला आहे. सध्या बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील कोमोरियन क्षेत्रात मान्सूनसाठी अतिशय पोषक वातावरण तयार झाले आहे.

अंदमान ओलांडून मान्सून मुख्य भूभागाकडे; असा असेल देशभरातील प्रवास
अंदमान-निकोबार बेट समूह ओलांडून मान्सूनचे वारे आता देशाच्या मुख्य भूभागाकडे झेपावत आहेत. हवामानातील अनुकूल बदलांमुळे केरळमध्ये मान्सून कोणत्याही क्षणी दाखल होण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रात 26 मे पासून ढग जमा होण्यास सुरुवात होईल आणि 10 जूनपर्यंत त्याचे अधिकृत आगमन होईल. यानंतर, 15 जूनच्या आसपास मान्सून मध्य प्रदेश व गुजरातमध्ये पोहोचेल, तर 25 जून ते 5 जुलै दरम्यान तो राजस्थानमध्ये प्रवेश करेल. भौगोलिक आणि हवामान परिस्थितीनुसार मान्सूनचा हा प्रवास 4 दिवस पुढे किंवा मागे होऊ शकतो, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा – Tukdebandi Law New Update : जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत राज्य सरकारचा अत्यंत मोठा निर्णय; आता एक गुंठाही जमीन..

'अल निनो'चे संकट; जूनमध्ये केवळ 80 टक्के पाऊस, शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचा सल्ला
मान्सून वेळेवर येत असला, तरी यंदा 'अल निनो' (Al Nino) या जागतिक हवामान घटकाचे सावट पावसावर असणार आहे. यामुळे जून महिन्यात मान्सूनचा पाऊस पुन्हा एकदा हुलकावणी देण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जून महिन्यात सरासरीच्या केवळ 80 टक्केच पाऊस पडू शकतो. सुरुवातीला हजेरी लावल्यानंतर जूनच्या मध्यात पाऊस गायब राहण्याची भीती आहे. पाऊस ओढ देण्याच्या या संकटामुळे बियाणे वाया जाऊन दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या पावसावर विसंबून तातडीने पेरणीची घाई करू नये, असा धोक्याचा इशारा कृषी तज्ज्ञांनी दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number