CGHS New Rates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! CGHS आरोग्य योजनेत मोठे बदल; 13 ऑक्टोबरपासून नवे दर लागू

केंद्रीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत वैद्यकीय सेवांच्या दरांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून हे नवीन दर 13 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत.

CGHS New Rates: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! CGHS आरोग्य योजनेत मोठे बदल; 13 ऑक्टोबरपासून नवे दर लागू

CGHS New Rates: महागाई भत्त्यात वाढ झाल्यानंतर, केंद्र सरकारने आपल्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना आणखी एक मोठा दिलासा दिला आहे. केंद्रीय आरोग्य योजना (CGHS) अंतर्गत वैद्यकीय सेवांच्या दरांमध्ये मोठे बदल करण्यात आले असून हे नवीन दर 13 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 2014 नंतर पहिल्यांदाच सुमारे 2,000 वैद्यकीय प्रक्रियांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गेल्या 15 वर्षांतील ही सर्वात मोठी सुधारणा मानली जात आहे. पूर्वीचे दर रुग्णालये आणि कर्मचाऱ्यांसाठी दोघांसाठीच अप्रासंगिक ठरत होते. नवीन सुधारित दरांमुळे केवळ कर्मचाऱ्यांना नव्हे तर संलग्न रुग्णालयांनाही आर्थिक स्थैर्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.

नवीन पॅकेज दर शहरांच्या श्रेणी (टियर-1, टियर-2, टियर-3) आणि रुग्णालयाच्या प्रकारावर अवलंबून असतील:

टियर-2 शहरांमध्ये पॅकेज दर 19 टक्के कमी असतील.
टियर-3 शहरांमध्ये दर 20 टक्के कमी असतील.
NABH मान्यताप्राप्त रुग्णालये मूळ दराने सेवा देतील.
NABH नसलेल्या रुग्णालयांना 15 टक्के कमी दराने सेवा देता येईल.
200 पेक्षा जास्त बेड असलेल्या सुपर-स्पेशालिटी रुग्णालयांना 15 टक्के जास्त दर लागू होतील.

हेही वाचा – Windows 10 Support End: 14 ऑक्टोबरनंतर विंडोज 10 लॅपटॉप बंद होणार?; काय आहे सत्य, जाणून घ्या

कर्मचाऱ्यांसाठी काय बदलणार?
केंद्रीय आरोग्य योजना (CGHS) ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना दिली जाणारी वैद्यकीय सुविधा आहे. या योजनेद्वारे बाह्यरुग्ण तपासणी, शस्त्रक्रिया, सल्लामसलत आणि रुग्णालयात राहणे यांसारख्या उपचारांवर अनुदानित दर मिळतात.

हेही वाचा – Gold-Silver Price Today: आजच्या बाजारात सोन्याचे दर घसरले, चांदीच्या भावात अचानक वाढ; जाणून घ्या

कर्मचाऱ्यांची दीर्घकाळापासूनची तक्रार होती की अनेक CGHS संलग्न रुग्णालये कॅशलेस सुविधा देण्यास नकार देतात आणि रुग्णांना आगाऊ पैसे भरावे लागतात. नवीन दरांमुळे ही समस्या दूर होण्याची शक्यता आहे. हे दर 13 ऑक्टोबरपासून देशभर लागू होणार असून, सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना या सुधारणांचा थेट लाभ मिळेल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number