Free LPG Connection: नवरात्रीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 25 लाख महिलांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) 25 लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन वाटप केले जाणार आहेत. या उपक्रमानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची एकूण संख्या 106 दशलक्षांपर्यंत पोहोचेल.

Free LPG Connection: नवरात्रीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 25 लाख महिलांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन

Free LPG Connection: नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत (PMUY) 25 लाख नवीन मोफत एलपीजी कनेक्शन वाटप केले जाणार आहेत. या उपक्रमानंतर उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची एकूण संख्या 106 दशलक्षांपर्यंत पोहोचेल. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. त्यांनी सांगितले की प्रत्येक कनेक्शनसाठी सरकार 2,050 खर्च करणार असून, त्यात मोफत गॅस सिलेंडर, गॅस स्टोव्ह, रेग्युलेटर आणि इतर आवश्यक उपकरणे असतील.

हेही वाचा – Share Market Today : आठवड्याची सुरूवात लालेलाल ; H-1B व्हिसा नियमांमुळे शेअर मार्केटच्या गटांगळ्या

महिलांसाठी नवरात्रीची भेट

पुरी यांनी या निर्णयाला महिलांसाठी नवरात्रीतील भेट म्हणून संबोधले. त्यांनी सांगितले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. मोदीजी महिला शक्तीला देवी दुर्गेसारखा सन्मान देतात. हा निर्णय माता-भगिनींचा आदर आणि सक्षमीकरण करण्याची आमची वचनबद्धता अधिक मजबूत करतो, असेही पुरी यांनी नमूद केले.

हेही वाचा – GST 2.0: आजपासून जीएसटी करात बदल, कोणत्या वस्तू स्वस्त अन् कोणत्या महाग? वाचा संपूर्ण यादी

जीएसटी सुधारणा आणि अर्थव्यवस्था

दरम्यान, पुरी यांनी नव्या जीएसटी सुधारणांबाबतही माहिती दिली. त्यांच्या मते, या सुधारणांमुळे देशाच्या GDP मध्ये 0.8 टक्के वाढ होऊ शकते. नवीन सुधारणा सोमवारपासून लागू झाल्या आहेत. गरीब, निम्न मध्यमवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांना याचा थेट फायदा होईल, कारण विविध ग्राहकोपयोगी वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. स्वावलंबी भारताच्या दिशेने जाण्याचा देशाचा मार्ग या सुधारणांतूनच अधिक बळकट होणार आहे, असंही पुरी यांनी म्हटलं आहे. या निर्णयामुळे महिला सक्षमीकरणास चालना मिळणार आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number