Vaibhav Naik : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव नाईकांचा विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी…’

माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाईक यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे.

Vaibhav Naik : उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव नाईकांचा विधान परिषदेच्या उमेदवारीबाबत मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, ‘राज्याचे प्रश्न मांडण्यासाठी…’

Vaibhav Naik: आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी आमदार वैभव नाईक यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना नाईक यांनी एक महत्त्वाची मागणी केली आहे. “आम्ही कोणाकडेही उमेदवारीची मागणी केलेली नाही, परंतु राज्याचे प्रश्न प्रखरपणे मांडण्यासाठी उद्धवजींनी स्वतः पुन्हा एकदा विधान परिषदेचे सदस्य म्हणून शपथ घेतली पाहिजे,” असे विधान करत त्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

कोकणात पुन्हा शिवसेना उभी करण्याचा निर्धार
वैभव नाईक यांनी यावेळी कोकणातील राजकीय स्थितीवरही भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी विधानमंडळात उपस्थित राहणे काळाची गरज असल्याचे सांगतानाच, त्यांनी ही मोठी जबाबदारी स्वीकारल्यास कार्यकर्त्यांना बळ मिळेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. “एकदा कोकणात पुन्हा नव्या जोमाने शिवसेना उभी करण्याचे काम आम्ही करू,” असा निर्धारही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर 15 मे रोजी मोठे आंदोलन
कोकणातील बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्या सोडवण्यासाठी आता शिवसेना (UBT) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र येताना दिसत आहेत. या संदर्भात स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि वैभव नाईक यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. येत्या 15 मे रोजी या प्रश्नांवर मोठे आंदोलन छेडले जाणार असून, या आंदोलनाला शिवसेना पक्षप्रमुखांनी पाठिंबा द्यावा, अशी विनंती त्यांना करण्यात आली आहे.

हेही वाचा – Sanjay Nirupam : “आपण पुनर्विचार करा, मराठी सक्तीमुळे…”, शिंदेगटात मराठी सक्तीवरून मतभेद; सरनाईकांच्या निर्णयाला निरुपमांचा विरोध

राजू शेट्टी आणि उद्धव ठाकरे यांच्यात खलबते
कोकणातील शेती आणि बागायतदारांच्या प्रश्नांवर आज ‘मातोश्री’वर महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरे यांना आंदोलनाची रूपरेषा सांगितली. राज्य सरकारचे शेतकरीविरोधी धोरण आणि कोकणातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी या आंदोलनाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे समजते, ज्यामुळे आगामी काळात महाविकास आघाडी आणि शेतकरी संघटनांची नवी युती पाहायला मिळू शकते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number