Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांचा होणार कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून अंर्थसंकल्पात मोठी घोषणा

या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पाच पवित्र ज्योतिर्लिंगांच्या कायापालटासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.<br/>

Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगांचा होणार कायापालट; मुख्यमंत्र्यांकडून अंर्थसंकल्पात मोठी घोषणा

Maharashtra Budget 2026 : राज्य सरकारने सन 2026-27 चा अर्थसंकल्प सादर करताना धार्मिक पर्यटन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर मोठा भर दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील पाच पवित्र ज्योतिर्लिंगांच्या कायापालटासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.

ज्योतिर्लिंगांसाठी ‘आयएएस’ (IAS) दर्जाचे समन्वयक
भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात आहेत. या देवस्थानांच्या परिसराचा विकास आणि भाविकांच्या सोयीसाठी सरकारने नवी रणनीती आखली आहे. पाचही ज्योतिर्लिंगांच्या विकासकामांवर देखरेख ठेवण्यासाठी 5 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी आणि सोयीसुविधांसाठी आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

महाराष्ट्रातील पाच ज्योतिर्लिंगे कोणती?

त्र्यंबकेश्वर (नाशिक)
भीमाशंकर (पुणे)
घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर)
परळी वैजनाथ (बीड)
औंढा नागनाथ (हिंगोली)

पायाभूत सुविधा आणि ‘चौथी मुंबई’चा संकल्प
केवळ धार्मिक स्थळेच नव्हे, तर दळणवळण आणि गृहनिर्माणासाठीही अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गावरील 5 स्थानकांचे काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नवी मुंबई विमानतळ आणि रायगडमधील पेण परिसराला ‘ग्रीन फील्ड’ म्हणून विकसित करून ‘तिसरी मुंबई’ उभारली जाईल. तर पालघरमधील वाढवण येथे ‘चौथी मुंबई’ विकसित करण्याचा मानस आहे. तथापी, वाहतूक केंद्र आणि शासकीय सेवांचे पूर्णपणे डिजिटायझेशन करण्यावर भर दिला जाणार आहे.

हेही वाचा – Farmer Loan Waiver 2026: बळीराजाला मोठा दिलासा! 2 लाखांपर्यंत कर्जमाफी; अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्याकडून ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर’ योजनेची घोषणा

30 लाख घरांचा आराखडा
मुंबईतील घरांची समस्या सोडवण्यासाठी सरकारने मेगा प्लॅन तयार केला आहे. मुंबईतील 20 लाख झोपडपट्टी घरांचा पुनर्विकास केला जाईल. सामान्य नागरिकांसाठी 10 लाख परवडणारी घरे निर्माण करण्याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे. दुबई आणि सिंगापूरच्या धर्तीवर मुंबईत पर्यटन गुंतवणूक आकर्षित केली जाईल.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number