Bhagwant Mann: ‘आधी शरद पवार, मग शिवसेना अन् आता आपमध्ये तीचं वॉशिंग मशीन…’; खासदारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजवर हल्लाबोल

आप खासदारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भारतीय जनता पक्षावर आणि पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर जोरदार हल्ला चढवला आहे.

Bhagwant Mann: ‘आधी शरद पवार, मग शिवसेना अन् आता आपमध्ये तीचं वॉशिंग मशीन…’; खासदारांच्या बंडानंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांचा भाजवर हल्लाबोल

Bhagwant Mann: आम आदमी पक्षाच्या (AAP) 7 राज्यसभा खासदारांनी राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पंजाबचे राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी भारतीय जनता पक्षावर आणि पक्षांतर करणाऱ्या खासदारांवर जोरदार हल्ला चढवला आहे. “भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून विश्वासघात केला आहे, पण पंजाबची जनता या गद्दारांना कधीच माफ करणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.

राघव चढ्ढांवर निशाणा; ‘वॉशिंग मशीन’चा उल्लेख
राघव चढ्ढा यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री मान म्हणाले की, जे कालपर्यंत पक्षाची जबाबदारी सांभाळत होते, ते आता भाजपच्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये जाऊन स्वच्छ झाले आहेत. “एखादी व्यक्ती कितीही मोठी असली, तरी तो पक्ष आणि विचारधारेपेक्षा मोठा नसतो,” असे म्हणत त्यांनी चढा यांच्यावर निशाणा साधला. भाजपमध्ये गेलेले हे खासदार आता पंजाबचे प्रतिनिधित्व करण्याचे नैतिक अधिकार गमावून बसले असून ते केवळ ‘गद्दार’ असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका
भगवंत मान यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, भाजपने यापूर्वी ज्याप्रमाणे शरद पवार यांचा पक्ष (NCP), शिवसेना (UBT) आणि काँग्रेसला फोडण्यासाठी ज्या ‘वॉशिंग मशीन’चा वापर केला, तोच प्रयोग आता आम आदमी पक्षावर केला जात आहे. “भाजपला पंजाबमध्ये स्वतःचा कोणताही जनाधार नाही, त्यामुळेच ते दुसऱ्यांचे घर फोडून आपला विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – Arvind Kejriwal: ‘भाजपने पुन्हा एकदा पंजाबी जनतेचा…’; राघव चढ्ढांच्या सोडचिठ्ठीनंतर अरविंद केजरीवालांची पहिली प्रतिक्रिया, भाजपवर साधला निशाणा

राज्यसभेत ‘आप’चे संख्याबळ घटले
राज्यसभेतील ‘आप’च्या एकूण खासदारांपैकी दोन-तृतीयांश खासदारांनी भाजपमध्ये विलीन होण्याची घोषणा केल्यामुळे संसदेत पक्षाची ताकद कमी झाली आहे. मात्र, या संकटाच्या काळातही मुख्यमंत्री मान यांनी ठाम भूमिका मांडली आहे. पक्ष या धक्क्यातून सावरून पुन्हा उभा राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला असून, पंजाबची जनता आगामी निवडणुकीत भाजपला आणि या गद्दारांना चोख प्रत्युत्तर देईल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number