Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या चौकशीबाबत विधिमंडळात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. या संवेदनशील प्रकरणाचा छडा लावण्यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार जागतिक पातळीवरील यंत्रणांची मदत घेतली जात आहे.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी अमेरिकेतील नामांकित तपास संस्था आणि परदेशातील तज्ज्ञांची एक विशेष चमू कार्यरत आहे. सहसा अशा विमान अपघातांचा सखोल तांत्रिक अहवाल येण्यासाठी 3 ते 4 वर्षांचा प्रदीर्घ कालावधी लागतो, मात्र हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने केंद्र सरकारने या तपास यंत्रणांना जलदगतीने काम करण्याची विशेष विनंती केली आहे, जी त्यांनी मान्य केली आहे.
ब्लॅक बॉक्सचे विश्लेषण पूर्ण
जानेवारीपूर्वी अहवाल मिळण्याची शक्यतासभागृहात बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, विमानाचा 'ब्लॅक बॉक्स' आणि इतर तांत्रिक उपकरणांचे प्राथमिक विश्लेषण आता पूर्ण झाले आहे. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालय आणि संबंधित मंत्र्यांशी झालेल्या चर्चेचा हवाला देत त्यांनी सांगितले की, 'एअरक्राफ्ट अक्सीडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो'चा (AAIB) अंतिम आणि मुख्य अहवाल येत्या जानेवारी महिन्यापूर्वी प्राप्त होईल.
अपघाताला सुमारे 6 महिने उलटून गेले असून, दिवंगत नेत्याच्या पहिल्या पुण्यतिथीपूर्वी हा चौकशी अहवाल समोर आणण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.सीबीआय आणि सीआयडी तपासाची दिशा अहवालावर अवलंबूनया प्रकरणाचा गुन्हेगारी आणि घातपाताच्या दृष्टिकोनातून तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाचे (CBI) काम सध्या तांत्रिक अहभावामुळे थांबलेले आहे.
हेही वाचा – 'ते स्टँडअप कॉमेडीत गेले असते तर…'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंना विधानसभेत खोचक टोला
सीबीआयने आधीच स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत AAIB चा अंतिम तांत्रिक अहवाल समोर येत नाही, तोपर्यंत पुढील कायदेशीर कारवाईला गती देता येणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, जानेवारीमध्ये हा अंतिम अहवाल हाती आल्यानंतरच सीबीआय आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (CID) यांना तपासाचे मुख्य धागेदोरे मिळतील आणि त्या आधारे पुढील कायदेशीर पावले उचलली जातील.