Anjali Damania On Parth Pawar: ‘पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा अन्यथा…’; अंजली दमानिया यांचा सरकारला तीव्र शब्दांत इशारा

आज दमानिया यांनी पुन्हा पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

Anjali Damania On Parth Pawar: ‘पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करा अन्यथा…’; अंजली दमानिया यांचा सरकारला तीव्र शब्दांत इशारा

Anjali Damania On Parth Pawar: पुणे जमीन घोटाळ्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर तातडीने गुन्हा (FIR) दाखल करण्याची मागणी केली आहे. या वादग्रस्त जमीन व्यवहारात त्यांचा थेट सहभाग असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. आज दमानिया यांनी पुन्हा पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या की, ‘पार्थ पवारांवर गुन्हा दाखल झालाचं पाहिजे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात कोकाटे रामायण सुरू आहे. त्यामुळे हा विषय संपल्यानंतर मी पुन्हा पार्थ पवारांचं प्रकरण लावून धरणार असून पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे.’ 

हेही वाचा – Pradhya Satav Join BJP: काँग्रेसला रामराम! प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश; म्हणाल्या, ‘देवाभाऊंच्या साथीने…’

दरम्यान, दमानिया यांनी महाराष्ट्रातील सध्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर टीका करताना म्हटलं की, सामान्य नागरिकांसाठी एक आणि राजकारण्यांसाठी एक, अशी दुहेरी कायदा व्यवस्था राज्यात सध्या सुरू आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, शीतल तेजवानी यांना महार वतनाच्या जमीन हडप प्रकरणात झालेली अटक केवळ दिखावा आहे. पार्थ पवार यांचे नाव एफआयआरमध्ये नाही. 1800 कोटींची सरकारी जमीन हडप करूनही मुख्य भागीदाराला अटक नाही, याकडे देखील दमानिया यांनी यावेळी लक्ष वेधलं.

हेही वाचा – Sanjay Raut: ‘माणिकराव कोकाटे ही हिट-विकेट, स्वत:ची कातडी वाचवण्यासाठी अजित पवार…’; संजय राऊतांचा थेट आरोप

दमानिया यांनी पुढे सांगितलं की, जमीन खरेदी करणारी ‘अमेडिया’ कंपनी आहे आणि त्यात पार्थ पवार यांची 99 टक्के भागीदारी आहे. असे असतानाही, केवळ 1 टक्का भागीदारी असलेल्या आणि सहीचे अधिकार असलेल्या व्यक्तीचे नाव एफआयआरमध्ये टाकण्यात आले आहे. मुख्य भागीदाराचे नाव गुन्ह्यात समाविष्ट झालेच पाहिजे, अशी मागणीही यावेळी दमानिया यांनी केली आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number