Tipu Sultan Photo Controversy : मालेगाव उपमहापौरांच्या दालनात ‘टिपू सुलतान’च्या फोटोवरून रणकंदन; शान-ए-हिंद यांच्या निर्णयामुळे हिंदू संघटनांचा संताप

नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे.

Tipu Sultan Photo Controversy : मालेगाव उपमहापौरांच्या दालनात ‘टिपू सुलतान’च्या फोटोवरून रणकंदन; शान-ए-हिंद यांच्या निर्णयामुळे हिंदू संघटनांचा संताप

Tipu Sultan Photo Controversy : मालेगाव महानगरपालिकेत सत्तापालट होताच आता वैचारिक संघर्षाची ठिणगी पडली आहे. नवनियुक्त उपमहापौर शान-ए-हिंद निहाल अहमद यांनी आपल्या अधिकृत दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावल्याने शहरात नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. या निर्णयामुळे हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या असून प्रशासकीय वर्तुळात तणावाचे वातावरण आहे.

नेमकी घटना काय?
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महापौरपदी इस्लाम पार्टीच्या नसरीन शेख, तर उपमहापौरपदी समाजवादी पार्टीच्या शान-ए-हिंद निहाल अहमद यांची निवड झाली आहे. उपमहापौरपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर शान-ए-हिंद यांनी त्यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावला. हा फोटो लावताच त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा – Aditya Thackeray: ‘मुंबईचे प्रश्न वाऱ्यावर, महापौरांचे लक्ष फक्त बांगलादेशींकडे…’; आदित्य ठाकरेंचा भाजप आणि नवनिर्वाचित महापौरांवर निशाणा

हिंदू संघटनांचा आक्रमक पवित्रा
सरकारी कार्यालयात वादग्रस्त ऐतिहासिक व्यक्तींचे फोटो लावल्याचा आरोप करत विविध हिंदुत्ववादी संघटनांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. “महापालिका हे लोकशाहीचे मंदिर आहे, तिथे अशा प्रकारचे फोटो लावून धार्मिक भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे,” अशी भूमिका संघटनांनी मांडली आहे. हा फोटो त्वरित न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. या प्रकरणाने मालेगावच्या स्थानिक राजकारणात मोठा गदारोळ निर्माण केला असून, आगामी काळात हा वाद चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number