MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत घरांसाठी चढाओढ सुरू; 16 हजार अर्ज दाखल, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अनामत रक्कम

लॉटरी जाहीर झाल्यानंतर अवघ्या पहिल्या दोन आठवड्यांत 16,455 अर्ज दाखल झाले आहेत. 12 एप्रिलपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यापैकी 8,529 अर्जदारांनी आपली अनामत रक्कम (EMD) देखील जमा केली आहे.<br/>

MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत घरांसाठी चढाओढ सुरू; 16 हजार अर्ज दाखल, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अनामत रक्कम

MHADA Mumbai Lottery 2026: मुंबईत हक्काचे घर स्वप्न पाहणाऱ्यांसाठी म्हाडाने काढलेल्या 2,640 घरांच्या लॉटरीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. लॉटरी जाहीर झाल्यानंतर अवघ्या पहिल्या दोन आठवड्यांत 16,455 अर्ज दाखल झाले आहेत. 12 एप्रिलपर्यंतच्या अधिकृत आकडेवारीनुसार, यापैकी 8,529 अर्जदारांनी आपली अनामत रक्कम (EMD) देखील जमा केली आहे.

महत्त्वाच्या तारखा आणि अर्ज प्रक्रिया
जर तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल, तर खालील वेळापत्रक लक्षात ठेवा:
अर्ज करण्याची शेवटची मुदत: 29 एप्रिल 2026.
अनामत रक्कम भरण्याची मुदत: 30 एप्रिल 2026.
सोडत (लॉटरी) जाहीर होणार: 15 मे 2026.
अधिकृत वेबसाईट: housing.mhada.gov.in

66 टक्के घरांचे बांधकाम अद्याप प्रगतीपथावर
यावेळच्या लॉटरीचे एक वैशिष्ट्य म्हणजे एकूण 2,640 घरांपैकी 1,762 घरांचे (66%) बांधकाम अद्याप सुरू आहे. यामध्ये प्रामुख्याने विक्रोळी, गोरेगाव आणि बोरिवली येथील घरांचा समावेश आहे.
बोरिवली पूर्व: 128 सदनिका (बांधकाम सुरू).
गोरेगाव पश्चिम: 85 सदनिका (बांधकाम सुरू).
विक्रोळी आणि कन्नमवार नगर: उर्वरित सदनिका.

29 लाखांपासून 6.82 कोटींपर्यंतची घरे
म्हाडाने सर्व उत्पन्न गटांचा विचार करून घरांच्या किमती निश्चित केल्या आहेत:
सर्वात स्वस्त घर: मानखुर्द येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी (EWS) असून त्याची किंमत 29 लाख रुपये आहे.
सर्वात महागडे घर: दक्षिण मुंबईतील ताडदेव येथे उच्च उत्पन्न गटासाठी असून त्याची किंमत 6.82 कोटी रुपये आहे.

हेही वाचा –  Mumbai Local Train: देशातील पहिली 'नॉन-एसी' बंद दरवाजांची लोकल मुंबईत दाखल; कुठे आणि किती वेळ थांबणार?

मुंबईत कुठे आहेत ही घरे?
मुंबईतील कानाकोपऱ्यात म्हाडाची घरे उपलब्ध आहेत. यामध्ये प्रामुख्याने विक्रोळी (कन्नमवार नगर), गोरेगाव (पहाडी आणि पत्राचाळ), बोरिवली (मागाठाणे आणि गोराई), चेंबूर (सुभाष नगर), वांद्रे (गांधीनगर), घाटकोपर (पंतनगर), गिरगाव, वडाळा (अँटॉप हिल), पवई (तुंगा आणि कोपरी), माझगाव आणि दादर (लोकमान्य नगर) या भागांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number