‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित होणार नाही; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटावर बंदी

मीडिया रिपोर्टनुसार, फवादचा हा कमबॅक चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. यामुळे अबीर गुलालच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.

‘अबीर गुलाल’ भारतात प्रदर्शित होणार नाही; पाकिस्तानी अभिनेता फवाद खानच्या चित्रपटावर बंदी
Edited Image, X

नवी दिल्ली: पहलगाममधील प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल देशभरात संताप व्यक्त होत आहे. ज्यामुळे बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर आणि पाकिस्तानी अभिनेता फवाद खान यांच्या आगामी 'अबीर गुलाल' चित्रपटाच्या प्रदर्शनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, फवादचा हा कमबॅक चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. यामुळे अबीर गुलालच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे. वाणी आणि फवादचा हा चित्रपट पुढील महिन्यात 9 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता.

'अबीर गुलाल' भारतात प्रदर्शित होणार नाही – 

2016 मध्ये निर्माता करण जोहरच्या 'ऐ दिल है मुश्किल' चित्रपटानंतर फवाद खानला भारतीय चित्रपटसृष्टीतून काढून टाकण्यात आले होते. 9 वर्षांच्या अंतरानंतर, 'अबीर गुलाल' चित्रपटाद्वारे त्याच्या पुनरागमनाची आशा होती. परंतु, आता त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत नकारात्मक बातम्या समोर येत आहेत. 

'अबीर गुलाल' चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर देखील मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाद्वारे फवाद खान बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार होता. परंतु, आता चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होऊ शकणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. भारतातील दहशतवादी हल्ल्यामुळे या चित्रपटाला विरोध होऊ लागला आहे आणि त्याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानी कलाकार. तथापि, फवाद खानने या घटनेचा निषेध करून पीडितांप्रती शोक व्यक्त केला होता.

हेही वाचा –  Pahalgam Attack Video: पहलगाम हल्ल्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ आला समोर; पहा दहशतवाद्यांनी कसा केला नरसंहार

थिएटर मालकांनी चित्रपट दाखवण्यास दिला नकार – 

पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय चित्रपटगृहांनी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चित्रपट थिएटरमध्ये कधी प्रदर्शित होईल हे अद्याप निश्चित नाही. चित्रपटगृह मालकांनी सांगितले की ते यापुढे पाकिस्तानी कलाकारांचे चित्रपट दाखवणार नाहीत. बुधवारी एका निवेदनात, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) ने 'अबीर गुलाल' चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या आपल्या निर्देशांचा पुनरुच्चार केला. 

हेही वाचा –  प्रत्येक अतिरेक्याला शोधून ठेचणार; पंतप्रधान मोदी बिहारमध्ये गरजले

याशिवाय, भारतीय चित्रपट आणि मनोरंजन उद्योगातील सर्व पाकिस्तानी कलाकार, गायक आणि इतर कलाकारांना कोणत्याही प्रकारचा पाठिंबा देऊ, नये असेही सांगितले. बुधवारी सोशल मीडियावर 'अबीर गुलाम'वर बहिष्कार टाकल्याची बातमी खरी ठरली. यानंतर सोशल मीडियावर #boycottAbirGulaal हा हॅशटॅग ट्रेंडिंग झाला. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number