Pavanraje Nimbalkar Case Verdict : ‘प्रकृती खालावलेली असतानाही…’; पद्मसिंह पाटलांच्या सुटकेनंतर वकील भूषण महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया समोर

या खटल्यामध्ये न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे.

Pavanraje Nimbalkar Case Verdict : ‘प्रकृती खालावलेली असतानाही…’; पद्मसिंह पाटलांच्या सुटकेनंतर वकील भूषण महाडिक यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Bhushan Mahadik: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर आज (20 जून 2026) अंतिम निकाल लागला आहे. या खटल्यामध्ये न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. हा निकाल खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी खूप मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे.

माफीच्या साक्षीदाराची साक्ष ठरली अविश्वसनीय
पवनराजे हत्याकांड प्रकरणाचा संपूर्ण पाया सरकारी पक्षाने ज्या माफीच्या साक्षीदारावर उभा केला होता, तोच न्यायालयाच्या निकालात कमकुवत ठरला. "या प्रकरणात माफीच्या साक्षीदाराची साक्ष पूर्णपणे अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत आहे. केवळ या साक्षीदाराच्या आधारावर आरोपींना शिक्षा देता येऊ शकत नाही," असे महत्त्वपूर्ण निरीक्षण न्यायमूर्तींनी नोंदवले. सरकारी पक्षासाठी हा सर्वात महत्त्वाचा धागा होता, परंतु तो न्यायालयात टिकू शकला नाही.

हेही वाचा – Pavanraje Nimbalkar Case Verdict : पवनराजे प्रकरणात माफीचा साक्षीदार विश्वासार्ह नाही, पुराव्याअभावी आरोपींची कोर्टाकडून निर्दोष मुक्तता

काय आहे मूळ प्रकरण?
3 जून 2006 रोजी मुंबईच्या कळंबोली परिसरात काँग्रेसचे तत्कालीन नेते आणि धाराशिवचे विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील पवनराजे निंबाळकर यांना गोळ्या झाडून संपवण्यात आलं होतं. या भीषण हल्ल्यात त्यांचा चालक समद काझी हेही मृत्यूमुखी पडले होते. या धक्कादायक दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता आणि या प्रकरणाचा तपास दीर्घकाळ सुरू होता.

निकालापूर्वी पद्मसिंह पाटील यांच्या वकिलांची प्रतिक्रिया
आजच्या अंतिम कामकाजापूर्वी पद्मसिंह पाटील यांचे वकील भूषण महाडिक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, हे प्रकरण खूप काळापासून प्रलंबित आहे. तक्रारदार पक्षाने यापूर्वी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी धाव घेतली होती. गेल्या 15-16 वर्षांपासून या खटल्याच्या तणावामुळे डॉ. पद्मसिंह पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे. आजही त्यांची तब्येत ठीक नसतानाही ते न्यायालयीन कामकाजासाठी उपस्थित राहिले. दीर्घ प्रतीक्षेनंतर आज लागलेल्या या निकालाने पद्मसिंह पाटील आणि इतर आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number