Amol Mitkari: ‘एक महिना झाला तरी अजितदादांचा पोस्टमार्टम रिपोर्ट गुलदस्त्यातच…’; अमोल मिटकरी यांचा सरकारवर घणाघात

'DGCA' ने सादर केलेल्या 23 पानांच्या प्राथमिक अहवालात प्रचंड त्रुटी असून, दादांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप का जाहीर करण्यात आला नाही, असा संतप्त सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे.

Amol Mitkari: ‘एक महिना झाला तरी अजितदादांचा पोस्टमार्टम रिपोर्ट गुलदस्त्यातच…’; अमोल मिटकरी यांचा सरकारवर घणाघात

Amol Mitkari: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला एक महिना उलटूनही अद्याप समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. ‘DGCA’ ने सादर केलेल्या 23 पानांच्या प्राथमिक अहवालात प्रचंड त्रुटी असून, दादांचा पोस्टमार्टम रिपोर्ट अद्याप का जाहीर करण्यात आला नाही, असा संतप्त सवाल मिटकरी यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणातील संशयास्पद बाबींमुळे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ‘अपघात की घातपात’ अशा शंका-कुशंका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह
गोजुबावी येथील अपघातस्थळी ज्या झाडाला विमान धडकल्याचे सांगितले जाते, तिथे तशी झाडेच नसल्याचा दावा मिटकरी यांनी केला आहे. याशिवाय, सीबीआय (CBI) चौकशीचे पुढे काय झाले आणि किती लोकांचे जबाब नोंदवले गेले, याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. देवगिरी आणि कलीना गेट नंबर 8 येथील सीसीटीव्ही फुटेज अद्याप का मिळाले नाही, तसेच विमानाचा ‘ब्लॅक बॉक्स’ सध्या नेमका कुठे आहे. तो परदेशात की बारामती पोलीस स्टेशनला आहे?, याबाबत सरकार मौन बाळगून असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि ‘व्हीएसआर’ कंपनीचा निष्काळजीपणा
विमान कंपनीच्या मालकाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यामध्ये मालक रोहित सिंह पायलटच्या बाजूच्या सीटवर झोपलेला दिसत आहे. “व्हीआयपी सुरक्षेसाठी ही कंपनी किती निष्काळजी होती, हेच यावरून सिद्ध होते,” असे मिटकरी म्हणाले. तसेच, अपघातावेळी विमानातील प्रवाशांच्या संख्येत झालेली तफावत (सुरुवातीला 6 लोक आणि नंतर 5 आढळले) यावरून अनेक संशय बळावले आहेत. या प्रकरणातील मुख्य दुवा मानला जाणारा सुमित कपूर देशात आहे की परदेशात, आणि पायलट साहिल मदन जिवंत आहे की मृत, याबाबतही सरकारने स्पष्टीकरण दिलेले नाही.

हेही वाचा – Dhananjay Munde: ‘मला संपवण्याचे षड्यंत्र न्यायव्यवस्थेने उधळले…’; क्लीन चिट मिळाल्यानंतर धनंजय मुंडे यांची पहिली प्रतिक्रिया

संवैधानिक लढा सुरूच राहणार; विधान परिषदेत उद्या चर्चा
या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश देऊनही त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या सचिवांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्याच्या कामकाजात या गंभीर विषयावर सभागृहात चर्चा होणार आहे. “अजित दादांना न्याय मिळेपर्यंत आमचा हा लढा संविधानिक पद्धतीने सुरूच राहील,” असा इशारा मिटकरी यांनी दिला आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number