Abhijeet Dipke : नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे पार पडलेल्या ‘FutureCrime Summit 2026’ दरम्यान अमेरिकेतील ‘RESecurity’ या एआय तंत्रज्ञान कंपनीने आपल्या सॉफ्टवेअरचे प्रात्यक्षिक दाखवताना कॉक्रोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांची वैयक्तिक माहिती वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. अनेक उच्चपदस्थ शासकीय अधिकाऱ्यांच्या हजेरीत झालेल्या या प्रकारामुळे, सरकारी यंत्रणा परदेशी कंपन्यांच्या सहाय्याने आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा थेट संशय दीपके यांनी व्यक्त केला आहे. या परिषदेत उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीकडून ही माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोशल मीडियाद्वारे प्रशासकीय हेतूवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
बेरोजगारीविरोधात देशव्यापी लढा
दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगर येथे गुरुवारी पार पडलेल्या 2 दिवसांच्या रणनीती बैठकीनंतर अभिजीत दीपके यांनी आपल्या पक्षाची पुढील दिशा स्पष्ट केली. देशातील वाढती बेरोजगारी हा अत्यंत कळीचा मुद्दा असल्याचे सांगत, या प्रश्नावर लवकरच संपूर्ण देशभरात मोठे आंदोलन उभारण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
My info was put on display by a US based AI startup @RESecurity to showcase their AI tool during FutureCrime Summit 2026 at Bharat Mandapam. This happened in the presence of many Govt officials as I am being told by someone who attended the summit. Is the Govt taking help of… pic.twitter.com/9FE5xXgnut — Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) August 6, 2026
तसेच जंतरमंतर येथील आंदोलनामुळे बेरोजगार तरुण आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने एकत्र आल्याचा दावा करत, माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा विद्यार्थी चळवळीचाच एक ऐतिहासिक विजय असल्याचे त्यांनी नमूद केले.