Maharashtra Bypoll Election 2026: निवडणूक आयोगाकडून बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा; ‘या’ दिवशी होणार मतदान

अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.

Maharashtra Bypoll Election 2026: निवडणूक आयोगाकडून बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीची घोषणा;  ‘या’ दिवशी होणार मतदान

Maharashtra Bypoll Election 2026:  केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसोबतच महाराष्ट्रातील दोन महत्त्वाच्या जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती आणि शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. बारामती आणि राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिलला मतदान होणार असून 4 मे रोजी मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीचे वेळापत्रक:
मतदान दिनांक: 23 एप्रिल 2026
मतमोजणी (निकाल): 4 मे 2026

बारामतीतून सुनेत्रा पवार रिंगणात, निवडणूक बिनविरोध होणार?
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे (एपी) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले की, बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार या पक्षाच्या उमेदवार असतील. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (एसपी) या निवडणुकीत उमेदवार न देण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांविरोधात निवडणूक लढवणाऱ्या युगेंद्र पवारांनी यावेळी माघार घेतल्याचे समजते. अजितदादांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आदर राखत ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी भूमिका शरद पवार गटाकडून घेतली जाऊ शकते.

राहुरीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना
अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील राहुरी विधानसभेची जागा भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त आहे. या ठिकाणी बारामतीसारखी परिस्थिती नसून महाविकास आघाडी ही निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शरद पवार यांच्या पक्षाकडून माजी आमदार प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हेही वाचा – Assembly Election 2026: 5 राज्यांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं; निवडणूक आयोगाकडून तारखांची घोषणा, पाहा संपूर्ण वेळापत्रक

देशातील इतर निवडणुका – 
निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचीही घोषणा केली असून संपूर्ण देशाचे लक्ष आता या निवडणूक निकालांकडे लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number