Sanjay Shirsat: एकनाथ शिंदेंकडून भाकरी फिरवण्याची तयारी? मंत्री संजय शिरसाटांनी दिले मोठे संकेत

मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे, हा सर्वस्वी एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे, असे म्हणत शिरसाटांनी भाकरी फिरवण्याचे संकेत दिले आहेत.<br/>

Sanjay Shirsat: एकनाथ शिंदेंकडून भाकरी फिरवण्याची तयारी? मंत्री संजय शिरसाटांनी दिले मोठे संकेत

Sanjay Shirsat: राज्याच्या राजकारणात सध्या मंत्र्यांच्या कामगिरीची मोठी चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या मंत्र्यामध्ये खांदेपालट करणार का? या प्रश्नावर शिवसेना प्रवक्ते आणि मंत्री संजय शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका मांडली आहे. “मंत्रिमंडळात कोणाला ठेवायचे आणि कोणाला काढायचे, हा सर्वस्वी एकनाथ शिंदे यांचा अधिकार आहे,” असे म्हणत शिरसाटांनी ‘भाकरी फिरवण्याचे’ संकेत दिले आहेत.

मंत्र्यांच्या कामगिरीत सुधारणेची अपेक्षा
संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले की, एकनाथ शिंदे हे पक्षाचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली सर्वजण काम करत आहेत. “सर्व मंत्र्यांनी चांगली कामगिरी करावी, ही त्यांची अपेक्षा चुकीची नाही. मंत्र्यांच्या कामात आणखी सुधारणा व्हावी आणि त्यांनी पक्षाचे काम जोमाने वाढवावे, हाच त्यांचा हेतू आहे. एखादा मंत्री नाराज आहे की नाही, यापेक्षा एकनाथ शिंदे यांना अपेक्षित असलेले काम सर्वांनी करणे महत्त्वाचे आहे,” असे शिरसाट यांनी नमूद केले.

एकनाथ शिंदे यांचा निर्णय अंतिम
मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांवर बोलताना शिरसाट म्हणाले की, शिवसेना प्रमुख शिंदे यांच्या अधिकारावर कोणीही गदा आणू शकत नाही. प्रशासकीय आणि राजकीय गरजांनुसार ते जो निर्णय घेतील, तो आमच्या सर्वांसाठी अंतिम असेल. शिंदे यांनी मंत्र्यांच्या कामाचा वेग वाढवण्याच्या दिलेल्या सूचना या सकारात्मक हेतूनेच आहेत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेही वाचा – Baramati Byelection 2026 : बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसच्या आकाश मोरेंची माघार; सुनेत्रा पवारांच्या विजयाचा मार्ग मोकळा

बारामतीत सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी झोकून देणार
महायुतीच्या उमेदवारीबाबत बोलताना शिरसाट यांनी बारामती लोकसभा मतदारसंघावर भाष्य केले. “महायुती म्हणून आमच्या सर्व नेत्यांनी सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जर ही निवडणूक बिनविरोध झाली नाही, तर आम्ही सर्वजण स्वतःला प्रचारात झोकून देऊ. बारामतीची जनता हुशार आहे; अजित दादांचे बारामतीसाठी असलेले योगदान त्यांना माहित आहे,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number