ECI Notice to Sunetra Pawar : निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र; पक्षाच्या घटनेतील बदलांबाबत मागितले स्पष्टीकरण

आयोगाने उपस्थित केलेल्या तांत्रिक त्रुटींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो आणि कोणती पूरक कागदपत्रे सादर करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ECI Notice to Sunetra Pawar : निवडणूक आयोगाचे सुनेत्रा पवारांना पत्र; पक्षाच्या घटनेतील बदलांबाबत मागितले स्पष्टीकरण

NCP Constitution Amendments 2026 : भारत निवडणूक आयोगाने (ECI) 27 जुलै 2026 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना एक महत्त्वपूर्ण पत्र पाठवले आहे. पक्षाच्या घटनेतील विविध कलमांमध्ये केलेल्या दुरुस्त्यांशी संबंधित अधिकृत प्रस्ताव आणि वैध कागदपत्रे आयोगाकडे वेळेत सादर करण्यात आलेली नाहीत, असा स्पष्ट उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या घटनेत केलेल्या अनेक महत्त्वाच्या बदलांना पाठबळ देणारे राष्ट्रीय कार्यकारिणीचे ठराव लवकरात लवकर सादर करावेत, असे निर्देश निवडणूक आयोगाने पक्षाला दिले आहेत.

कलम 6, 7, 12, 32 अन् 36 मधील बदलांवर आयोगाचे बोट
सुनेत्रा पवार यांनी 10 मार्च 2026 आणि 7 एप्रिल 2026 रोजी निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रांनुसार पक्षाच्या घटनेतील कलम 6, 7, 12, 18(i), 32 आणि 36 मध्ये बदल करण्यात आले आहेत. मात्र, पक्षाने आयोगाकडे जमा केलेल्या कागदपत्रांमध्ये केवळ कलम 18(i) संदर्भातील 26 फेब्रुवारी 2026 च्या राष्ट्रीय अधिवेशनातील ठरावाचाच समावेश आहे. उर्वरित कलम म्हणजेच 6, 7, 12, 32 आणि 36 मधील दुरुस्त्यांना मान्यता देणारे कोणतेही अधिकृत ठराव आयोगाला प्राप्त झालेले नसल्याने, या बदलांशी संबंधित मान्यताप्राप्त दस्तऐवज जमा करणे आता पक्षासाठी आवश्यक ठरले आहे.

हेही वाचा – Prashant Kishor : Gen Z चा राजकीय धमाका! 30 वर्षांचा भाजपचा गड ढासळला, प्रशांत किशोरांच्या ऐतिहासिक विजयामागची 6 मोठी कारणं

अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाध्यक्षपदाची जबाबदारी
28 जानेवारी रोजी मुंबईहून बारामतीकडे जाणाऱ्या विमानाचा बारामती विमानतळाजवळ भीषण अपघात झाला होता, ज्यामध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या घटनेनंतर पक्षाचे नेतृत्व सावरण्यासाठी 26 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईत पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एकमुखाने निर्णय घेत सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती आणि त्यासंबंधीचे बदल आयोगाला कळवण्यात आले होते.

निवडणूक आयोगाच्या पत्रावर राष्ट्रवादीच्या प्रतिसादाकडे लक्ष
आयोगाने उपस्थित केलेल्या तांत्रिक त्रुटींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यावर काय भूमिका घेतो आणि कोणती पूरक कागदपत्रे सादर करतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. घटनेतील बदलांना कायदेशीर मान्यता मिळवण्यासाठी पक्षाला राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व संबंधित ठराव तातडीने आयोगाकडे सादर करावे लागतील. या पत्रव्यवहारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कायदेशीर आणि केंद्रीय यंत्रणेकडून लवकरात लवकर योग्य ते दस्तऐवज सादर केले जाण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – Dhananjay Munde : 'राजकारणात राहावं की नाही…'; पंकजा मुंडेंपाठोपाठ धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने खळबळ

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number