माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी अखेर सरकारी निवास सोडलं

चंद्रचूड यांनी अखेर दिल्लीतील 5, कृष्णा मेनन मार्ग येथील सरन्यायाधीशांचे अधिकृत निवासस्थान सोडले आहे. नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ या बंगल्यात राहिल्यामुळे वाद निर्माण झाला होता.

माजी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी अखेर सरकारी निवास सोडलं

नवी दिल्ली: भारताचे माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड यांनी अखेर दिल्लीतील 5, कृष्णा मेनन मार्ग येथील सरन्यायाधीशांचे अधिकृत निवासस्थान सोडले आहे. ते 8 नोव्हेंबर 2024 रोजी निवृत्त झाले होते. परंतु नियोजित वेळेपेक्षा अधिक काळ या बंगल्यात राहिल्यामुळे वाद निर्माण झाला होता. न्यायमूर्ती चंद्रचूड, त्यांच्या पत्नी कल्पना आणि मुली प्रियांका व माही यांच्यासोबत राहात होते. त्यांच्या दोन्ही मुली अपंग असल्याने व्हीलचेअर-अनुकूल घराची आवश्यकता असल्याचा मुद्दा त्यांनी पुढे केला होता. 

दरम्यान 7 जुलै रोजी माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, सामान पॅक करण्यात आले आहे. आम्ही लवकरच भाड्याने घेतलेल्या घरात स्थलांतरीत होणार आहोत. सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाने केंद्र सरकारला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते की, माजी सरन्यायाधीश नियोजित कालावधी ओलांडून निवासस्थानी राहात आहेत. त्यास उत्तर देताना चंद्रचूड यांनी त्यांच्या वैयक्तिक परिस्थितीचे आणि वैद्यकीय अडचणीचे कारण दिले होते.

हेही वाचा – सरकारी बंगला रिकामा करा…! सर्वोच्च न्यायालयाचा माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांना आदेश

न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी त्यांच्या उत्तराधिकारी न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्याशी बोलून पुढील निवासाच्या संदर्भात सल्ला घेतला होता. न्यायमूर्ती खन्ना यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांना अधिकृत सरन्यायाधीश बंगल्यात रहायचे नाही. त्यामुळे चंद्रचूड हे तात्पुरत्या स्वरूपात तिथेच राहत होते. 

हेही वाचा – संजीव खन्ना झाले भारताचे ५१ वे सरन्यायाधीश

तथापी, या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर अखेर न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांनी सरकारी निवासस्थान पूर्णपणे रिकामे केले आहे. तसेच ते त्यांच्या कुटुंबासह नवीन ठिकाणी स्थलांतरित झाले आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड हे भारताचे 50 वे सरन्यायाधीश होते. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय दिले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number