Eknath Shinde: ‘कुत्रे टोळक्याने येतात, पण वाघ एकटाच येतो…’; शिवसेना वर्धापन दिनी एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला इशारा

शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि विरोधकांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला.

Eknath Shinde: ‘कुत्रे टोळक्याने येतात, पण वाघ एकटाच येतो…’; शिवसेना वर्धापन दिनी एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला इशारा

Eknath Shinde: शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि विरोधकांवर अत्यंत आक्रमक शब्दांत हल्लाबोल केला. व्यासपीठावरील नेते, मंत्री, खासदार आणि आमदारांचा उल्लेख ‘माझे ऐश्वर्य’ असा करत त्यांनी समोर बसलेल्या अथांग शिवसैनिकांना ‘माझी खरी संपत्ती’ असे संबोधिले. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले, “आजकाल काही कुत्रे रोज भुंकतात, पण मी तुम्हाला सांगतो, कुत्रे नेहमी टोळक्याने येतात. पण वाघ एकटाच येतो आणि शिकार करून जातो. ते फक्त भुंकतच राहतात आणि तोपर्यंत वाघ आपली शिकार फत्ते करून जातो.”

हेही वाचा – Gulabrao Patil : ‘302-307 कलम वाल्यांना खासदार केले’; गुलाबराव पाटलांचा ठाकरे गटावर घणाघात

“बाळासाहेबांचे विचार आणि सर्वसामान्यांचा आधार म्हणजेच शिवसेना”

एकनाथ शिंदे आपल्या भाषणात शिवसेनेच्या मूळ संकल्पनेची आणि बाळासाहेबांच्या विचारांची व्याख्या मांडली. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या अस्मितेची चळवळ म्हणून शिवसेना उभी राहिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचा अजेंडा पुढे नेणे, मराठी माणसाचा निर्धार जपणे, देशद्रोहींवर प्रहार करणे आणि सर्वसामान्यांना न्याय देणे म्हणजेच खरी शिवसेना आहे. हीच शिवसेना माझ्या लाडक्या बहिणींचा स्वाभिमान, शेतकऱ्यांचा कैवारी आणि वारकऱ्यांचा जयजयकार करणारी संघटना आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ऐतिहासिक कामगिरीचा गौरव आणि जाहीर अभिनंदन
या सोहळ्यात शिंदे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे भरभरून कौतुक केले. तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊन मोदींनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून 140 कोटी जनतेच्या गौरवशाली प्रगतीचे ते प्रतीक बनले आहेत, असे शिंदे म्हणाले. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीवर आजपर्यंत कोणीही डाग लावू शकलेले नाही आणि जगातील अनेक देशांनी त्यांना सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित केले आहे, असे सांगत शिंदेंनी दिल्लीतील अभिनंदन प्रस्तावाचा संदर्भ दिला. दिल्लीत शिवसेनेच्या वतीने मला भाषण करण्याचा मान मिळाला, असे सांगत त्यांनी वर्धापन दिन मेळाव्यात उपस्थित सर्व शिवसैनिकांना उभे राहून, दोन्ही हात वर करून टाळ्यांच्या गजरात पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number