Keto Diet and Breast Cancer : सावधान! केटो डाएटमुळे ‘स्तनाचा कर्करोग’ बळावण्याचा धोका? संशोधनातून खळबळजनक दावा

संशोधक वैद्यकशास्त्रज्ञांनी उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींना केटो डाएटपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे, कारण उच्च चरबीयुक्त आहारामुळे त्यांच्या समस्येत वाढ होऊ शकते.

Keto Diet and Breast Cancer : सावधान! केटो डाएटमुळे ‘स्तनाचा कर्करोग’ बळावण्याचा धोका? संशोधनातून खळबळजनक दावा

Keto Diet Side Effects And Breast Cancer : झटपट वजन कमी करण्यासाठी जगभरातील महिला आणि तरुणांमध्ये सध्या केटोजेनिक आहाराची (केटो डाएट) लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. हा आहार वापरल्यास वजन कमी होण्यात मदत होते, असा अनेकांना वाटते. मात्र, अमेरिकेतील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका नवीन संशोधनातून केटो डाएटबद्दल एक खळबळजनक इशारा देण्यात आला आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आहाराच्या या पद्धतीमुळे स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) बळावण्याचा धोका वाढू शकतो.

केटो डाएटचा इतिहास आणि स्वरूप
केटो डाएटचा उगम 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात झाला. सुरुवातीला मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी ही आहार पद्धती वापरली गेली, तर 1920 पासून लहान मुलांच्या अपस्मारावर (Epilepsy) उपचार करण्यासाठी आधुनिक वैद्यांनी याचा वापर सुरू केला. हृदयरोग तज्ज्ञ रॉबर्ट सी. अ‍ॅटकिन्स यांनी 1960 च्या दशकात लोकप्रिय केलेला केटोजेनिक आहार हा अतिशय कमी कर्बोदक (Low Carb) आणि उच्च चरबीयुक्त (High Fat) आहार आहे. यात कर्बोदकांचे सेवन तीव्रपणे कमी करून चरबीने बदलणे समाविष्ट असते. कर्बोदकांमधील ही घट मानवी शरीराला केटोसिस नावाच्या चयापचय अवस्थेत आणते. अल्प काळात हा आहार वजन कमी करण्यासाठी, कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब सुधारण्यासाठी यशस्वी ठरला आहे, पण दीर्घकाळ असा आहार घेणे सुरू ठेवले तर याचे काय परिणाम होतात, याबद्दल अजूनही ठोस उत्तरे मिळालेली नाहीत.

उच्च चरबीमुळे कर्करोगाचा धोका
अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ युटा येथील हंट्समन कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील शास्त्रज्ञांनी काही महिन्यांपूर्वी केटो डाएट पद्धतीवर संशोधन केले. डॉ. अमांडिन चेक्स यांनी सांगितले की, जेव्हा स्तनाचा कर्करोग निर्माण करणाऱ्या पेशींचे विभाजन होऊन वाढ होते, तेव्हा शरीरातील अतिरिक्त चरबी या पेशींसाठी 'बिल्डिंग ब्लॉक्स' म्हणून काम करते. म्हणजेच, रक्तातील चरबीचे जास्त प्रमाण पेशींच्या वाढीला मदत करते. संशोधकांनी हा प्रयोग उच्च चरबीयुक्त आहार घेणाऱ्या आणि आनुवंशिकरीत्या रक्तात चरबीची उच्च पातळी असलेल्या उंदरांवर केला, ज्यात त्यांना चरबीचे प्रमाण आणि स्तनाचा कर्करोग यांच्यात थेट संबंध आढळला.

हेही वाचा – Health Tips : 5 प्रकारच्या सीडस् किंवा बिया वृद्धांसाठी ठरू शकतात धोकादायक! जपून खा, अन्यथा शरीर बनेल रोगांचे घर

कर्करोगाच्या पेशी लिपिड्सवर चालतात
संशोधनाचे सह-प्रमुख अभ्यासक डॉ. केरेन हिलगेंडॉर्फ म्हणाले, “लोकांनी लठ्ठपणात फॅट आणि लिपिड्सला फारसे महत्त्व दिलेले नाही. पण, आमच्या संशोधनानुसार, स्तनाच्या कर्करोगाच्या पेशी प्रत्यक्षात लिपिड्सवर चालतात. याच कारणामुळे हा आजार लठ्ठ व्यक्तींमध्ये अधिक तीव्र स्वरूपात दिसतो.” जर एखाद्या पेशीला वाढ किंवा विभाजनाचा सिग्नल मिळाला आणि त्या वाढीसाठी शरीरात चरबीचे प्रमाण उपलब्ध असेल, तर कर्करोगाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो, असे डॉ. चेक्स यांनी स्पष्ट केले.

तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला आणि संशोधनाची मर्यादा
संशोधक डॉ. ग्रेग डकर यांनी उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्या व्यक्तींना केटो डाएटपासून दूर राहण्याचा इशारा दिला आहे, कारण उच्च चरबीयुक्त आहारामुळे त्यांच्या समस्येत वाढ होऊ शकते. लठ्ठपणाने त्रस्त असलेल्या महिलांना कोणताही नवीन आहार सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. औषधोपचार किंवा आहारातील बदलांच्या मदतीने शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे आहे. शास्त्रज्ञांनी या संशोधनाच्या मर्यादा नमूद करताना स्पष्ट केले आहे की, हा अभ्यास प्राथमिक टप्प्यात असून उंदरांचे चयापचय मानवापेक्षा वेगळे असते. डॉ. हिलगेंडॉर्फ यांनी मानवी पेशींवर आणि रुग्णांवर आधारित अधिक संशोधनाची गरज असल्याचे स्पष्ट केले आहे, ज्यामुळे केटो डाएट करणाऱ्यांना सध्या तरी कोणतीही भीती बाळगण्याची गरज नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, कोणत्याही गोष्टीचा परस्पर अवलंब न करता, तो तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा, असे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – Health Tips: 'या' पाच लोकांनी चुकूनही पेरु सेवन करु नये

(Disclaimer : ही बातमी संशोधनावर आधारित आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा हमी देत नाही.)

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number