Maharashtra Monsoon Session 2026: ‘मोठ्या उद्योगपतींसाठी तरुण सुशिक्षितांना मारू नका…’; भाई जगताप यांचा सरकारला इशारा

सौरऊर्जा हेच जगाचे भविष्य असून या क्षेत्रात महाराष्ट्रातील विशेषतः दुष्काळी भागातील अनेक सुशिक्षित तरुण मोठ्या आशेने उतरले आहेत.

Maharashtra Monsoon Session 2026: ‘मोठ्या उद्योगपतींसाठी तरुण सुशिक्षितांना मारू नका…’; भाई जगताप यांचा सरकारला इशारा

Bhai Jagtap: राज्यातील सौरऊर्जा (Solar Energy) क्षेत्रातील वाढत्या अडचणींवर आणि टीओडी शुल्काच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते भाई जगताप यांनी सरकारचे लक्ष वेधले आहे. सौरऊर्जा हेच जगाचे भविष्य असून या क्षेत्रात महाराष्ट्रातील विशेषतः दुष्काळी भागातील अनेक सुशिक्षित तरुण मोठ्या आशेने उतरले आहेत. अशा वेळी एखाद्या मोठ्या उद्योगपतीचा फायदा ध्यानात ठेवून या क्षेत्रातील हजारो छोट्या व्यावसायिकांना आणि नवउद्योजकांना अडचणीत आणू नका, अशी आग्रही मागणी भाई जगताप यांनी विधानसभा अधिवेशनात केली आहे.

दुष्काळी भागासाठी सौरऊर्जा हेच ‘वरदान’
आपली बाजू मांडताना भाई जगताप म्हणाले की, जगभरामध्ये सौरऊर्जा हाच एकमेव कायमस्वरूपी राहणारा ऊर्जास्रोत आहे. आपल्या देशाने आणि राज्यानेही यासाठी खूप चांगली पावले उचलली आहेत. जालन्यासारख्या ठिकाणी एका प्रकल्पाला सुमारे 300 कोटी रुपयांचा फायदा झाल्याचे उदाहरण दिले जाते; परंतु त्या एका मोठ्या प्रकल्पासाठी या क्षेत्रात नव्याने काम करणाऱ्या 3000 किंवा 30000 तरुणांच्या भविष्याशी खेळू नका. हा केवळ प्रश्नोत्तराचा तास नसून राज्याच्या आणि देशाच्या भवितव्याचा विषय आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी हा उद्योग एक मोठे वरदान ठरू शकतो.

हेही वाचा – Raj Thackeray: ‘मराठी शिका, अन्यथा चेहऱ्यावर बाराखडी…’; मराठीच्या मुद्द्यावरून राहुल नार्वेकर यांना राज ठाकरेंचा इशारा

टीओडी (TOD) शुल्काविरोधात कोर्टात धाव; तातडीने बैठक घेण्याची मागणी
टीओडी नियमांमुळे निर्माण झालेल्या वादावर बोलताना त्यांनी सांगितले की, या नियमांच्या विरोधात आम्ही यापूर्वीच न्यायालयात गेलो आहोत. आता या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असून, त्यापूर्वी सरकारने या क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांची आणि सुशिक्षित तरुणांची एक संयुक्त बैठक घ्यावी, जेणेकरून त्यांच्या समस्यांचे जागेवरच निवारण करता येईल. ही समस्या वैयक्तिक नसून संपूर्ण राज्याच्या हिताची आहे.

उद्योगाला पुढील 10 वर्षे शासकीय पाठबळाची गरज
दरवर्षी कुठलेही सरकार आले तरी बजेटचा जवळजवळ 50 ते 60 टक्के हिस्सा दुष्काळी भागाला मदत करण्यासाठी वापरला जातो. जर आपण सौरऊर्जा क्षेत्राला मजबूत केले, तर हा भाग स्वयंपूर्ण होऊ शकतो. हे काम एका किंवा दोन वर्षांत होणारे नाही, त्यासाठी कदाचित 10 वर्षे लागतील. पण जर आपण पुढील 10 वर्षे या नवीन उद्योजकांना आणि तरुणांना पाठबळ दिले नाही, तर हा उद्योग पूर्णपणे कोलमडून जाईल. तसेच, या उद्योगाचे भविष्य हे ‘बॅटरी स्टोरेज’ तंत्रज्ञानावर अवलंबून असल्याचे सांगत त्यांनी बॅटरीच्या महत्त्वाचाही आवर्जून उल्लेख केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number