Chandrashekhar Bawankule: ‘अब्दुल सत्तारांनी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली होती का?’ चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल

महायुतीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी किंवा जाहीरपणे बोलण्यापूर्वी आपल्या पक्षाच्या मुख्य नेत्याची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

Chandrashekhar Bawankule: ‘अब्दुल सत्तारांनी एकनाथ शिंदेंची परवानगी घेतली होती का?’ चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट सवाल

Chandrashekhar Bawankule: महायुतीमधील अंतर्गत समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी आणि नेत्यांच्या वक्तव्यांमुळे निर्माण होणारे वाद टाळण्यासाठी एक महत्त्वपूर्ण नियम करण्यात आला आहे. महायुतीच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी किंवा जाहीरपणे बोलण्यापूर्वी आपल्या पक्षाच्या मुख्य नेत्याची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. महायुतीच्या समन्वय समितीच्या बैठकीत हा निर्णय आधीच एकमताने घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा – Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi: मोठी बातमी! राज्यातील बळीराजासाठी गुड न्यूज, कर्जमाफीवर फडणवीसांनी दिली माहिती

अब्दुल सत्तारांच्या वक्तव्यावरून बावनकुळेंचा सवाल
समन्वय समितीच्या या नियमाचा दाखला देत चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना (शिंदे गट) नेते अब्दुल सत्तार यांच्या विधानावर थेट बोट ठेवले. बावनकुळे म्हणाले की, “समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार नेत्यांनी बोलण्यापूर्वी पक्षप्रमुखांची संमती घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता अब्दुल सत्तार यांनी नुकतेच जे वक्तव्य केले आहे, त्यापूर्वी त्यांनी आपले पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रीतसर परवानगी घेतली होती का, हे त्यांनाच विचारावे लागेल.”

वाद टाळण्यासाठी समन्वय समितीचा शिस्तीचा बडगा
महायुतीमधील तिन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये योग्य ताळमेळ राहावा आणि आगामी काळात कोणतीही विसंगत विधाने समोर येऊ नयेत, यासाठी हा शिस्तीचा नियम लागू करण्यात आला आहे. प्रत्येक पक्षाच्या नेत्याला आता जाहीर भूमिका मांडताना आपल्या वरिष्ठ नेत्याच्या परवानगीचा अडथळा पार करावा लागणार आहे. बावनकुळे यांच्या या जाहीर वक्तव्यामुळे आता महायुतीत अब्दुल सत्तारांच्या विधानावरून आणि नेत्यांच्या बोलण्याच्या स्वातंत्र्यावरून अंतर्गत चर्चांना उधाण आले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number