Puran Kumar Death Case: IPS वाय पूरण कुमार मृत्यू प्रकरणाला नवे वळण; माजी DGP शत्रुजीत कपूर यांची SIT कडून चौकशी

दिवंगत आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांनी आपल्या आठ पानी नोटमध्ये कपूर यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याचे समोर आले आहे.<br/>

Puran Kumar Death Case: IPS वाय पूरण कुमार मृत्यू प्रकरणाला नवे वळण; माजी DGP शत्रुजीत कपूर यांची SIT कडून चौकशी

Puran Kumar Death Case: हरियाणा केडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास चंदीगड पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) वेगाने सुरू आहे. या मृत्यू प्रकरणातील नोटमध्ये ज्यांची नावे नमूद आहेत, त्या आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांचे जबाब एसआयटीकडून नोंदवले जात आहेत. याच तपासाचा भाग म्हणून, एसआयटीने काही दिवसांपूर्वी हरियाणाचे माजी पोलीस महासंचालक (डीजीपी) शत्रुजीत कपूर यांची चौकशी केली. दिवंगत आयपीएस अधिकारी वाय. पूरण कुमार यांनी आपल्या आठ पानी नोटमध्ये कपूर यांच्यावर गंभीर आरोप केले असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar Crime : धक्कादायक! मित्राला भेटण्यासाठी गेली, तरुणांनी दारू पाजली अन्…

आतापर्यंत या प्रकरणात नमूद केलेल्या 14 पैकी 11 आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यात आले असून, उर्वरित तीन अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्याची तयारी एसआयटीकडून सुरू आहे. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर राज्य सरकारने शत्रुजीत कपूर यांना डीजीपी पदावरून हटवले होते. यापूर्वी त्यांना दोन महिन्यांच्या सुट्टीवर पाठवण्यात आले होते. सुट्टी संपण्याच्या एक दिवस आधीच, सरकारने रात्री उशिरा आदेश काढून त्यांना पदावरून कार्यमुक्त केले. त्यानंतर कपूर यांनी हरियाणा पोलीस गृहनिर्माण महामंडळाच्या अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे.

हेही वाचा – Crime News: आधी फुकट पाणीपुरीसाठी आग्रह; नकार दिल्यानंतर त्याने थेट चाकू काढला आणि काहीच क्षणांत…

दरम्यान, 7 ऑक्टोबर रोजी चंदीगडमधील त्यांच्या खासगी निवासस्थानी वाय. पूरण कुमार यांचा गोळी लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. घटनास्थळावरून त्यांचे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर, आठ पानांची चिठ्ठी जप्त करण्यात आली होती. दरम्यान, दिवंगत आयपीएस अधिकाऱ्यांच्या पत्नी आणि वरिष्ठ आयएएस अधिकारी अमनीत पी. कुमार यांनी हरियाणाचे डीजीपी शत्रुजीत सिंग कपूर तसेच रोहतकचे पोलीस अधीक्षक नरेंद्र बिजारनिया यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीत आपल्या पतीला दीर्घकाळ जातीय भेदभाव, मानसिक छळ आणि अपमान सहन करावा लागल्याचा दावा केला आहे. मृत्यूपूर्वी आपल्या पतीने नोट लिहून ठेवल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. या प्रकरणामुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, एसआयटीचा तपास कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number