Devendra Fadnavis on Thackeray Alliance : ‘दोन अस्तित्वहीन पक्ष…’; ठाकरे बंधूंच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांची खोचक प्रतिक्रिया

'दोन पक्ष केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत, यापलीकडे या युतीचा दुसरा कोणताही अर्थ नाही,' अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या युतीवर निशाणा साधला. <br/>

Devendra Fadnavis on Thackeray Alliance : ‘दोन अस्तित्वहीन पक्ष…’; ठाकरे बंधूंच्या युतीवर देवेंद्र फडणवीस यांची खोचक प्रतिक्रिया

Devendra Fadnavis on Thackeray Alliance: ठाकरे बंधूंच्या ऐतिहासिक युतीची घोषणा होताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेत यावर सडकून टीका केली आहे. ‘दोन पक्ष केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व वाचवण्यासाठी एकत्र आले आहेत, यापलीकडे या युतीचा दुसरा कोणताही अर्थ नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाच्या युतीवर निशाणा साधला. 

‘पुतीन आणि झेलेन्स्की’च्या भेटीसारखं वातावरण कशाला?

काही प्रसारमाध्यमांमध्ये या युतीला मिळणाऱ्या प्रसिद्धीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मिश्किल टिप्पणी केली. ते म्हणाले, ‘काही ठिकाणी ही युती अशी दाखवली जात आहे की जणू रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपून त्यांच्यात मैत्री होत आहे. एकीकडून पुतीन आणि दुसरीकडून झेलेन्स्की निघाले आहेत, असं चित्र उभं केलं जातंय. मुळात ही युती केवळ मजबुरीतून झाली आहे.’ ठाकरे बंधू एकत्र आल्याचा मला वैयक्तिक आनंदच आहे, मात्र राजकीयदृष्ट्या यामुळे कोणतेही मोठे फेरबदल होतील, असा भ्रम कुणीही बाळगू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – Thackeray Pawar Alliance: शिवतीर्थावर साद, मुंबईत नवा नाद! राज आणि उद्धव ठाकरे यांची युती फायनल; पण पवारांची राष्ट्रवादी नाराज?

मराठी आणि अमराठी जनतेचा विश्वासघात केल्याचा आरोप

ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा करताना मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या मंडळींनी मुंबईकरांचा सातत्याने विश्वासघात केला आहे. मराठी माणसाला मुंबईबाहेर घालवण्याचे पाप यांनीच केले असून, दुसरीकडे अमराठी बांधवांवर सतत हल्ले केले आहेत. त्यामुळे आता कोणताही समाज या युतीसोबत उभा राहणार नाही. यांचा ‘ट्रॅक रेकॉर्ड’ केवळ भ्रष्टाचार आणि स्वार्थाचा आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

हेही वाचा – Bawankule On Raj-Uddhav Thackeray: ‘नुसतं मराठी-मराठी करून जमणार नाही, जनता…’; ठाकरे बंधूंच्या युतीवर बावनकुळेंचा घणाघात

भावनिक नौटंकीला जनता भुलणार नाही – 

निवडणुकीच्या तोंडावर भावनिक आवाहन करण्याच्या धोरणावर प्रहार करताना मुख्यमंत्री म्हणाले की, ‘जनता आता हुशार झाली आहे. फक्त भावनिक बोलून मते मिळवण्याचे दिवस संपले आहेत. ठाकरे बंधूंनी आणखी दोन-चार पक्ष सोबत घेतले तरी मुंबईकर महायुतीच्या विकासाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील.’ 

विकासाच्या मुद्द्यावर महायुतीलाच कौल

दरम्यान, मराठी माणसाला मुंबईतच हक्काची घरे देण्याचा कार्यक्रम महायुती सरकारने प्रभावीपणे राबवला आहे, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी आगामी महापालिका निवडणुकीत विजयाचा विश्वास व्यक्त केला. मुंबईकरांनी आमचा विकास पाहिलेला आहे. त्यामुळे जनतेचा कौल विकासालाच असेल आणि महायुतीच मुंबईवर भगवा फडकवेल, असा पुनरुच्चार त्यांनी केला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number