पवार शिवपुतळा प्रकरणी राजकारण करत आहेत

शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेवर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पवार शिवपुतळा प्रकरणी राजकारण करत आहेत

नागपूर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेवर सगळे राजकीय नेते भाष्य करताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घटना अत्यंत दुःखद आहे आणि तिच्यावर राजकारण करणे टाळावे अशी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विश्वास दिला की घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. 

नौदलने गंभीरतेने चौकशी सुरू केली असून दोषींवर कारवाईची प्रक्रिया चालू आहे. बांधकाम विभागाने पोलिसात तक्रार केली आहे. नौदलाच्या अहवालानंतर पोलिसांनी कारवाई सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे. फडणवीस यांनी विरोधकांना इशारा देत म्हटले की, राजकारणाच्या हेतूने या घटनेचा वापर केला तर महाराष्ट्राची हानी होईल.शरद पवार यांनी शिवपुतळा प्रकरणी केलेल्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना त्यांनी पवारांना लक्ष केले. नौदलने पुतळा तयार केला आहे, राज्यसरकारने नाही असे ते म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number