‘निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातायत’

संध्याकाळचे सहा वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका; असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

‘निवडणूक आयोग कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्या जातायत’

मुंबई, २० मे २०२४, प्रतिनिधी : मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे सुरू केले आहे. निकालाच्या दिवसानंतर अर्थात चार जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. संध्याकाळचे सहा वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका; असे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number