Devendra Fadnavis: ‘मी महाराष्ट्रात आहे आणि इथेच…’; दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

या चर्चांना पूर्णविराम देत फडणवीस म्हणाले की, ते काल दिल्लीहून नागपूरला आले, आज नागपूरमध्ये आहेत आणि संध्याकाळी मुंबईला जाणार आहेत.

Devendra Fadnavis: ‘मी महाराष्ट्रात आहे आणि इथेच…’; दिल्लीच्या राजकारणात जाण्याच्या चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis:  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या सर्व चर्चा फेटाळून लावत आपण महाराष्ट्रातच राहून आपली जबाबदारी पार पाडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांच्या अलीकडील दिल्ली दौऱ्यांनंतर त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची किंवा शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी सोपवली जाण्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. या चर्चांना पूर्णविराम देत फडणवीस म्हणाले की, ते काल दिल्लीहून नागपूरला आले, आज नागपूरमध्ये आहेत आणि संध्याकाळी मुंबईला जाणार आहेत; त्यामुळे ते महाराष्ट्रातच असून इथेच राहणार आहेत. या विधानातून त्यांनी सध्यातरी राज्यातील आपली भूमिका सोडण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या रॅलीवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली असून त्यात काही गैर नाही. परीक्षा आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न हे एका पक्षापुरते मर्यादित नसून संपूर्ण देशाशी संबंधित आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत अत्यंत संवेदनशील असून परीक्षा प्रणाली पारदर्शक करण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. सोमवारी केंद्र सरकार एक महत्त्वपूर्ण विधेयक मांडणार असून त्यामध्ये पेपर फुटीसारख्या गैरप्रकारांविरोधात कठोर कारवाईची तरतूद असेल. परीक्षा प्रणालीत पारदर्शकता आणणे आणि विद्यार्थ्यांचे हित जपणे यासाठी कडक कायदे बनवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

हेही वाचा – Thackeray Bandhu: शिवाजी पार्कवरील विजयी सभेनंतर उद्धव ठाकरे 'शिवतीर्थ'वर दाखल; महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

उद्धव ठाकरे यांनी केलेल्या राजकीय आरोपांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, गेल्या दशकात अशी विधाने वारंवार केली गेली आहेत; परंतु त्याचा कोणताही परिणाम झालेला नाही. संपूर्ण भारतातील जनता पंतप्रधान मोदींच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. रात्री 1 वाजता इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला मोदींचा व्हिडिओ जागतिक विक्रम मोडतो, यावरून देश कोणाच्या बाजूने उभा आहे हे स्पष्ट होते, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number