Baramati Devansh Patharkar Speech :छोट्या पठ्ठ्याने अजितदादांवर केलं दमदार भाषण; रोहित पवारांसह उपस्थितांची जिंकली मनं

या लहानग्या देवांशने केवळ भाषणच केले नाही, तर आपल्या भाषणातून दिवंगत अजित पवार यांच्या कार्याचा आढावाही घेतला.

Baramati Devansh Patharkar Speech :छोट्या पठ्ठ्याने अजितदादांवर केलं दमदार भाषण; रोहित पवारांसह उपस्थितांची जिंकली मनं

Baramati Devansh Patharkar Speech : बारामतीमधील काटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत एका तिसरीतील चिमुरड्याने आपल्या वक्तृत्वाने सर्वांची मने जिंकली आहेत. आमदार रोहित पवार हे निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने काटेवाडी दौऱ्यावर असताना त्यांनी या शाळेला सदिच्छा भेट दिली. यावेळी देवांश लखन पाथरकर या इयत्ता 3 री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने अतिशय आत्मविश्वासपूर्ण कसलेल्या वक्त्याप्रमाणे भाषण करत सर्वांचे कौतुक मिळवले. येथे उपस्थित असलेले रोहित पवार आणि इतर नागरिकही या चिमुरड्याचे भाषण ऐकून थक्क झाले.

साडेसहा मिनिटांचे प्रभावी भाषण
या लहानग्या देवांशने केवळ भाषणच केले नाही, तर तब्बल साडेसहा मिनिटे बोलताना अजित पवार यांच्या कार्याचा आढावा घेतला. अजित दादांचे नेतृत्व, त्यांची शिस्त आणि ‘दिलेला शब्द पाळणारा नेता’ अशी त्यांची ओळख देवांशने आपल्या शैलीत मांडताना त्याने सर्वांना खिळवून ठेवले. “बोले तैसा चाले” या उक्तीप्रमाणे प्रशासनावर पकड असणाऱ्या नेत्याचे वर्णन या 8 वर्षांच्या मुलाने इतक्या प्रभावीपणे केले की, रोहित पवारांनाही त्याच्या कौशल्याचे कौतुक करण्यावाचून राहवले नाही.

हेही वाचा – Abandoned Vehicles In Pune: पुणेकरांनो लक्ष द्या! तुमची गाडी रस्त्यावर धूळ खात असेल तर सावधान; बेवारस गाड्यांवर आजपासून जप्तीचा हातोडा

रोहित पवारांची विशेष भेट आणि कौतुक
बारामती पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान सुनेत्रा पवार यांच्यासाठी फिरत असताना रोहित पवारांनी या शाळेला भेट दिली होती. दुसऱ्या गावाला जाण्यापूर्वी देवांशचे भाषण ऐकण्यासाठी ते आवर्जून थांबले. जबरदस्त उत्साहात भाषण करणाऱ्या या मुलाला पाहून त्यांनी त्याचे भरभरून कौतुक केले. कार्यकर्त्यांची इत्थंभूत माहिती असणाऱ्या आणि धडाडीचे नेतृत्व करणाऱ्या अजितदादांसारख्या नेत्याबद्दलचे त्याचे विचार ऐकून उपस्थित सर्वांनीच टाळ्यांचा कडकडाट करत त्याला दाद दिली.

काटेवाडीचा चिमुरडा चर्चेत
काटेवाडी येथील या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका जिल्हा परिषद शाळेत शिकणारा तिसरीतील मुलगा इतक्या प्रगल्भ भाषेत भाषण करू शकतो, याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. राजकारणातील दिग्गज नेत्यांच्या नावांचा उल्लेख करत आणि त्यांच्या कार्यपद्धतीवर साडेसहा मिनिटांचे प्रदीर्घ भाषण केल्यामुळे देवांश सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. या लहान वयातील त्याच्या कलागुणांमुळे त्याचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक घटना, गॅस एजन्सीवरच ग्राहकाने फोडून घेतलं स्वत:चं डोकं, भयंकर प्रकार उघड

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number