Solapur Election Result : तुरुंगात असूनही महापालिका निवडणुकीत करिश्मा ! खुनाचा आरोप असलेल्या शालन शिंदे विजयी

सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपने निर्भेळ यश मिळवले असून, मनसे नेत्याला संपवण्याचा आरोप असलेल्या उमेदवार शालन शिंदे यांनी चक्क तुरुंगातून निवडणूक जिंकली आहे.

Solapur Election Result : तुरुंगात असूनही महापालिका निवडणुकीत करिश्मा ! खुनाचा आरोप असलेल्या शालन शिंदे विजयी

Solapur Election Result : सोलापूर महानगरपालिकेच्या निकालांनी आज राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. सर्वाधिक चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक 2 मध्ये भाजपने निर्भेळ यश मिळवले असून, मनसे नेत्याला संपवण्याचा आरोप असलेल्या उमेदवार शालन शिंदे यांनी चक्क तुरुंगातून निवडणूक जिंकली आहे. याच प्रभागातून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे सुपुत्र किरण देशमुख हे तब्बल 11000 मतांच्या विक्रमी फरकाने विजयी झाले आहेत.

शालन शिंदे यांचा विजय

प्रभाग 2 'क' मधून निवडणूक लढवणाऱ्या भाजपच्या शालन शिंदे या सध्या मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांच्या मृत्यू प्रकरणात तुरुंगात आहेत. गंभीर आरोप आणि अटकेत असूनही, मतदारांनी त्यांना कौल दिला आहे. त्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्याचा सुमारे 4000 मतांनी पराभव केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या वादातून बाळासाहेब सरवदे यांना संपवण्यात आलं होतं, ज्यामध्ये शालन शिंदे यांच्यासह 15 जणांवर गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026: छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय भूकंप; शिवसेनेच्या 30 वर्षांच्या सत्तेला सुरुंग? MIM ची अनपेक्षित मुसंडी

आमदारपुत्राचा 'दबदबा' कायम

आमदार विजयकुमार देशमुख यांचे चिरंजीव किरण देशमुख यांनी या निवडणुकीत आपली ताकद सिद्ध केली आहे. शिवसेनेच्या गणेश कुलकर्णी यांच्याशी झालेल्या थेट लढतीत त्यांनी 11000 मतांची मोठी आघाडी घेत विजय संपादन केला. त्यांच्यासोबतच भाजपच्या कल्पना कारभारी आणि नारायण बनसोडे यांनीही या प्रभागातून बाजी मारली असून भाजपने या प्रभागात आपले वर्चस्व राखले आहे.

हेही वाचा – Latur Election Results 2026 : काँग्रेसची मुसंडी, वंचितच्या साथीने उडवला भाजपचा धुव्वा; इतक्या जागा काबीज

 मनसेचा संताप

या धक्कादायक निकालानंतर मनसेच्या गोटात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोलापूर मनसेचे लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे यांनी उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, एखाद्या व्यक्तीला संपवून जर आरोपी तुरुंगातून निवडून येत असेल, तर ही खूप गंभीर बाब आहे. सत्ता आणि पैशांच्या जोरावर ही निवडणूक जिंकली गेली असून मतदारांनी अशा प्रवृत्तीला पाठबळ देणे हे समाजासाठी घातक आहे. 
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number