Crime News : काळजाचा थरकाप उडेल! आई-वडिलांनी संपवलं जीवन; 5 वर्षांचा चिमुकला रात्रभर जंगलात मृतदेहांची राखण करत बसला

हे पती-पत्नी आपल्या मुलासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला. संतापलेल्या दाम्पत्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि...

Crime News : काळजाचा थरकाप उडेल! आई-वडिलांनी संपवलं जीवन; 5 वर्षांचा चिमुकला रात्रभर जंगलात मृतदेहांची राखण करत बसला

Odisha Crime News : घरगुती वादातून आई-वडिलांनी टोकाचे पाऊल उचलल्यानंतर, एका 5 वर्षांच्या चिमुकल्याने कडाक्याच्या थंडीत रात्रभर जंगलात आपल्या पालकांच्या मृतदेहांची राखण केली. त्या बिचाऱ्याला माहीतही नव्हतं की आपल्या आई-वडिलांना काय झालं आहे.. आणि तो कोणत्या परिस्थितीत सापडलाय.. हा अंगावर शहारे आणणारा प्रकार रविवारी (28 डिसेंबर) सकाळी उघडकीस आला.

जंगलात घडलेला थरार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जियानंतपाली गावातील रहिवासी दुष्मंत माझी आणि रिंकी माझी हे आपल्या मुलासोबत दुचाकीवरून जात असताना त्यांच्यात घरगुती वाद झाला. संतापलेल्या दाम्पत्याने आपली दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि जंगलात सुमारे 1 किलोमीटर आत चालत गेले. तिथे या दोघांनीही कीटनाशक पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे, त्यांनी आपल्या निष्पाप मुलालाही विष दिले होते, परंतु सुदैवाने तो बचावला. पण आई-वडिलांच्या विषप्राशनानंतर या चिमुकल्याला त्यांच्या मृतदेहांसोबत जंगलात एक भयंकर रात्र काढावी लागली. ओडिशाच्या देवगड जिल्ह्यातून माणुसकीला चटका लावून जाणारी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या सर्व घटनेचा या चिमुकल्याच्या मनावर खोल आघात झाला आहे.

रात्रभर भीतीच्या छायेत
विष प्राशन केल्यानंतर एका तासाच्या आतच दुष्मंत यांचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी रिंकी बेशुद्ध पडली. मात्र, तो 5 वर्षांचा निरागस मुलगा आपल्या पालकांना जमिनीवर पडलेले पाहत तिथेच बसून राहिला. कडाक्याच्या थंडीत आणि हिंस्त्र श्वापदांची भीती असलेल्या दाट जंगलात त्या चिमुकल्याने रात्रभर आपल्या आई-वडिलांची सोबत सोडली नाही. सूर्योदय होताच मदतीसाठी तो जंगलातून बाहेर पडला आणि रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांना त्याने घडलेला प्रकार सांगितला.

हेही वाचा – Noida Shocker: 10 वीच्या विद्यार्थिनीने 8 व्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, कारण ऐकून तुम्हाला बसेल धक्का

उपचारादरम्यान आईचाही अंत
देवगड जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज चोपदार यांनी सांगितले की, स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बेशुद्ध अवस्थेत असलेल्या रिंकीला शेजारच्या अंगुल जिल्ह्यातील छेंदीपाडा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. अशा प्रकारे एका क्षुल्लक वादापायी एका चिमुकल्याच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र कायमचे हरपले.

चिमुकल्याची प्रकृती स्थिर
सध्या या 5 वर्षांच्या मुलाची प्रकृती चांगली असून प्राथमिक उपचारानंतर त्याला त्याच्या आजी-आजोबांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ज्या वयात पालकांच्या कुशीत सुरक्षित राहायचे, त्या वयात या मुलावर जंगलात पालकांच्या मृतदेहाची राखण करण्याची वेळ आली, हे ऐकून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा – Crime News: बायकोकडे 20 रुपयांची मागणी; नकार मिळताच नवऱ्याने आधी गळा आवळला आणि मग ट्रेनखाली…

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number