Cyber ​​Fraud: दिल्ली पोलिसांचा मोठा सायबर स्ट्राइक; 50 कोटींच्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश, सूत्रधारासह 9 जण अटकेत

आग्नेय जिल्हा पोलिसांनी सात राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकत ही कारवाई राबवली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशभर पसरलेल्या सुनियोजित फसवणूक नेटवर्कविरोधात ही मोहीम राबवण्यात आली.

Cyber ​​Fraud: दिल्ली पोलिसांचा मोठा सायबर स्ट्राइक; 50 कोटींच्या फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश, सूत्रधारासह 9 जण अटकेत

Cyber ​​Fraud:  दिल्ली पोलिसांनी सायबर गुन्ह्यांविरोधातील कारवाईत मोठे यश मिळवत आंतरराष्ट्रीय डिजिटल फसवणूक आणि खंडणी रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बहु-राज्यीय समन्वित कारवाईत टोळीचा सूत्रधार आणि त्याचे नऊ सहकारी अशा एकूण 10 जणांना अटक करण्यात आली असून, या टोळीने 50 कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. आग्नेय जिल्हा पोलिसांनी सात राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकत ही कारवाई राबवली. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, देशभर पसरलेल्या सुनियोजित फसवणूक नेटवर्कविरोधात ही मोहीम राबवण्यात आली. राष्ट्रीय सायबर गुन्हे अहवाल पोर्टल (NCRP) वर नोंदवलेल्या 61 तक्रारींशी या टोळीचा थेट संबंध असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

दिल्ली, मुंबई (महाराष्ट्र), केरळ, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे छापे टाकण्यात आले. या कारवाईत मुख्य आरोपी टोळीचा मास्टरमाइंड याला केरळमधून अटक करण्यात आली, तर दिल्ली आणि मुंबईतूनही अनेक सहकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, या टोळीची कार्यपद्धती अत्यंत प्रगत होती. बनावट ओळखपत्रे तयार करणे, फिशिंगद्वारे नागरिकांची वैयक्तिक माहिती मिळवणे आणि धमक्यांच्या माध्यमातून पैसे उकळणे अशा विविध पद्धतींचा वापर करण्यात येत होता. मुख्य सूत्रधार केरळमधून संपूर्ण कारभार नियंत्रित करत होता, तर दिल्ली आणि मुंबईतील सहकारी तांत्रिक तसेच आर्थिक व्यवहार सांभाळत होते. फसवणुकीतून मिळालेल्या रकमेचे तात्काळ लाँडरिंग करण्याचीही व्यवस्था या टोळीने उभारली होती.

हेही वाचा – Chandrapur Crime News: सावकारी जिंकली, व्यवस्था हरली; कर्जाच्या ओझ्याखाली बळीराजाने किडनी विकली

डीसीपींचे वक्तव्य

आग्नेय जिल्ह्याचे पोलीस उपायुक्त (डीसीपी) हेमंत तिवारी म्हणाले, 'ही कारवाई एक स्पष्ट संदेश देते की, तुमचे नेटवर्क कितीही मोठे असो किंवा तुम्ही डिजिटल माध्यमातून कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी, कायदा अंमलबजावणी संस्था तुम्हाला शोधून काढतील.' ते पुढे म्हणाले, 'आम्ही पुरावे गोळा करण्यावर भर देत असून, एनसीआरपीवर नोंदवलेल्या 61 तक्रारींमधील प्रत्येक पीडिताला न्याय मिळावा यासाठी कटिबद्ध आहोत.' 

हेही वाचा – Latur Crime : एक कोटीच्या 'टर्म इन्शुरन्स'साठी स्वतःच्या हत्येचा बनाव , महिलेसोबतच्या चॅटिंगने उलगडले भयानक जळीत हत्याकांडाचे रहस्य

पुढील तपास

जप्त करण्यात आलेल्या डिजिटल पुराव्यांमध्ये मोबाईल फोन, संगणक तसेच बँक खात्यांशी संबंधित कागदपत्रांचा समावेश आहे. या पुराव्यांच्या आधारे आंतरराष्ट्रीय सिंडिकेटशी संबंधित आणखी दुवे आणि संपूर्ण नेटवर्क उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास सुरू असून, आणखी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number