अमरावतीतील मोर्शी शहरातील दमयंती नदीच्या काठावर नवजात अर्भक सापडले आहे. सापडलेले अर्भक हे मृतावस्थेत आहे. या मृत अर्भकामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.
दमयंती नदीच्या काठावर कैलाश टॉकीजला लागूनच नवजात अर्भक नागरिकांना निदर्शनास आलं.
ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. यानंतप परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. अनैतिक संबंधातून या बाळाचा जन्म झाला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
तसेच अज्ञात व्यक्तींनी पहाटे या अर्भकाला निर्जन ठिकाणी आणून टाकले असावे, अशी शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
दरम्यान मोर्शी पोलिसांनी या बाळाचा मृतदेह रुग्णालयात पाठवला आहे. तसेच या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.