CJP Protest: खासदारापाठोपाठ आता भाजपच्या माजी आमदाराच्या लेकीचं बंड; CJP आंदोलनात पाठिंबा देत मोदी सरकारवर साधला निशाणा

भाजप पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातून आता थेट विरोधाचे सूर उमटू लागले असून, सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या लेकींनीच 'सीजेपी' विद्यार्थी आंदोलनात उडी घेत शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं

CJP Protest: खासदारापाठोपाठ आता भाजपच्या माजी आमदाराच्या लेकीचं बंड; CJP आंदोलनात पाठिंबा देत मोदी सरकारवर साधला निशाणा

CJP Protest: भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत वर्तुळातून आता थेट विरोधाचे सूर उमटू लागले असून, सत्ताधारी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या लेकींनीच 'सीजेपी' (CJP) विद्यार्थी आंदोलनात उडी घेत शासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशातील फतेहपूरचे माजी भाजप आमदार विक्रम सिंह यांची कन्या आणि सुप्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर यशस्विनी राजे सिंह हिने थेट दिल्लीतील जंतर-मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवला. यापूर्वी भाजप खासदार अपराजिता सारंगी यांची कन्या अर्चिता सचिन राहर हिनेदेखील सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बाजूने उभे राहत खळबळ उडवून दिली होती. सत्तापक्षाच्या घरातूनच अशा प्रकारे उघडपणे विरोध दर्शविल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

माजी मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या भाषेवर तीव्र आक्षेप; खिल्ली उडवत साधला निशाणा
‘अल जझीरा’ या आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत यशस्विनी सिंहने माजी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरून जोरदार टीकास्त्र सोडले. प्रधान यांनी आपल्या राजीनामा पत्रात 'देशविरोधी शक्ती' या आंदोलनाचा गैरफायदा घेऊ शकतात, असा उल्लेख केला होता. यावर प्रतिक्रिया देताना यशस्विनीने म्हटले की, "धर्मेंद्र प्रधान यांचे राजीनामा पत्र पाहिल्यानंतर ते स्वतःच्या चुकीची कबुली देणारे किंवा दिलगीर व्यक्त करणारे वाटत नाहीत, तर जणू काही ते स्वतःला एखाद्या मोठ्या 'शहीद'च्या रुपात सादर करत आहेत, असा आव आणत आहेत." तसेच, या राजीनाम्याला ऐतिहासिक क्षण मानणे अत्यंत संकुचित मनोवृत्तीचे लक्षण असल्याची परखड टीकाही तिने केली.

डिजिटल मीम्स आणि इन्स्टाग्रामच्या जोरावर तरुणांचे अभूतपूर्व संघटन
'सीजेपी' आंदोलनाच्या यशाविषयी बोलताना यशस्विनीने या आंदोलनाची रचना आणि पद्धतीचे कौतुक केले. सामान्यतः राजकीय किंवा सामाजिक घडामोडींपासून अलिप्त राहणाऱ्या तरुण वर्गाला एकत्र आणण्यासाठी या आंदोलनाने डिजिटल माध्यमांचा अतिशय प्रभावी वापर केला आहे. इन्स्टाग्राम, डिजिटल मीम्स आणि आकर्षक संदेशांच्या माध्यमातून तरुणांपर्यंत पोहोचून त्यांनी एक प्रभावी जनआक्रोश उभा केला. हा केवळ एका विशिष्ट गटाचा नसून डिजिटल युगातील संपूर्ण तरुण पिढीचा एक मोठा विजय असल्याचे मत तिने व्यक्त केले.

हेही वाचा – Crime News: 'आई, मला माफ कर…'; लग्नानंतर अवघ्या 8 महिन्यांत नवविवाहित शिक्षिकेने उचललं टोकाचं पाऊल, भावनिक व्हिडीओ शेअर करून मांडली व्यथा

राजकीय पार्श्वभूमीपासून पूर्णपणे अलिप्त आणि आर्थिकस्वातंत्र्याचा दावा
दरम्यान, वडील भाजपचे प्रभावी नेते असले तरी, कौटुंबिक आणि राजकीय विचारसरणीत आपण खूप वेगळे असल्याचे यशस्विनीने स्पष्ट केले. आपण गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या हिमतीवर आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी जीवन जगत असून कुटुंबापासून आणि मूळ गावापासून बऱ्याच अंतरावर राहत असल्याचे तिने सांगितले. आपल्या वैयक्तिक जीवनात राजकीय प्रभावापासून एक सुरक्षित अंतर राखल्यामुळेच आपण कोणत्याही भीतीशिवाय आणि दबावाविना थेट विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहून आपले रोखठोक मत मांडू शकत असल्याचे तिने ठामपणे नमूद केले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number