Dasara Melava 2025: राज्यात दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी सुरू; ‘या’ 5 दसरा मेळाव्यांमुळे विजयादशमीच्या दिवशी राजकीय वातावरण तापणार

यंदाही 2 ऑक्टोबरला नागपूरपासून मुंबई, बीडपर्यंत अनेक दसरा मेळावे पार पडणार असून राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.<br/>

Dasara Melava 2025: राज्यात दसरा मेळाव्यांची जय्यत तयारी सुरू; ‘या’ 5 दसरा मेळाव्यांमुळे विजयादशमीच्या दिवशी राजकीय वातावरण तापणार

Dasara Melava 2025: दसऱ्याचा दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात दरवर्षी नवा वळण घेऊन येतो. राज्यातील विविध राजकीय पक्ष आणि नेते आपल्या मेळाव्यांद्वारे महत्त्वाचे संदेश देतात. यंदाही 2 ऑक्टोबरला नागपूरपासून मुंबई, बीडपर्यंत अनेक दसरा मेळावे पार पडणार असून राजकीय घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी मैदानावर होणार आहे. यावेळचा मेळावा विशेष ठरणार असल्याची चर्चा आहे, कारण उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एका मंचावर दिसण्याची शक्यता आहे. शिवसेना-मनसे युतीबाबत घोषणा होईल का? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

शिंदे गटाचा दसरा मेळावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा यंदा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये आयोजित केला आहे. केवळ एमएमआर परिसरातील शिवसैनिकांसाठी हा कार्यक्रम असेल. शिंदे यांच्या भाषणात ते कोणते नवे राजकीय संकेत देतात याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

हेही वाचा – Bombay High Court : पृथ्वीराज चव्हाणांसह राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावरील 2020 दंगलप्रकरण मागे घेण्यास परवानगी; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय

मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे यांचा भव्य दसरा मेळावा बीड जिल्ह्यातील नारायणगडावर होणार आहे. यासाठी 900 एकरवर व्यवस्था केली जात असून लाखोंच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडण्याची अपेक्षा आहे.

पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा

दरम्यान, भाजप नेत्या पंकजा मुंडे भगवानगडावर आपला दसरा मेळावा घेणार आहेत. सकाळी 11 वाजून 15 मिनिटांनी त्या ध्यानमंदिरात पूजा करतील आणि नंतर उपस्थितांना संबोधित करतील. या मेळाव्यासाठी हेलिपॅड आणि मोठ्या प्रमाणावर सुविधा उभारल्या जात आहेत.

हेही वाचा – Maharashtra Cabinet Decisions : कर्करोगग्रस्तांसाठी महाकेअर फाऊंडेशन, तसेच उद्योगविभागासाठी विशेष तरतूद, मंत्रिमंडळ बैठकीतील 5 मोठे निर्णय

स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा – 

याशिवाय, नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा यंदा विशेष महत्त्वाचा आहे. संघाच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने या विजयादशमीला शताब्दी वर्षाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत काय संदेश देतात याकडे देशाचे लक्ष असेल. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत.

तथापी, नागपूरच्या दीक्षाभूमीवर दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. यंदा 69 वा वर्धापन दिन असून देशभरातून लाखो अनुयायी नागपुरात दाखल होणार आहेत. पावसाची शक्यता लक्षात घेऊन शाळा, महाविद्यालये, समाजभवनांत राहण्याची सोय करण्यात आली आहे. भोजनदान आणि अन्य सोयीसुविधांची मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. एकाच दिवशी होणाऱ्या या सर्व मेळाव्यांमुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच रंगणार आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number