R. Harshita: नृत्यांगणा हर्षिताचा अनोखा पराक्रम; भरतनाट्यम 8 मिनिटांत चढल्या 574 पायऱ्या

हर्षिता हिने फक्त 8 मिनिटे 54 सेकंदांत 574 पायऱ्या चढून सर्वांना अचंबित केले. विशेष म्हणजे, ही चढाई तिने धावत किंवा चालत नाही, तर प्रत्येक पायरीवर विविध भरतनाट्यम मुद्रा सादर करत पूर्ण केली.<br/>

R. Harshita: नृत्यांगणा हर्षिताचा अनोखा पराक्रम; भरतनाट्यम 8 मिनिटांत चढल्या 574 पायऱ्या

R. Harshita: कर्नाटक राज्यातील कोप्पल जिल्ह्यात अंजनाद्री टेकडीवर नुकताच भक्ती, कला आणि सहनशक्तीचा अनोखा संगम पाहायला मिळाला. होस्पेट येथील तरुण भरतनाट्यम नृत्यांगना कुमारी आर. हर्षिता हिने फक्त 8 मिनिटे 54 सेकंदांत 574 पायऱ्या चढून सर्वांना अचंबित केले. विशेष म्हणजे, ही चढाई तिने धावत किंवा चालत नाही, तर प्रत्येक पायरीवर विविध भरतनाट्यम मुद्रा सादर करत पूर्ण केली. हर्षिताचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून हजारो लोक तिच्या भक्तीभावाने आणि कलाकारित्वाने प्रभावित झाले आहेत. पायऱ्यांना स्टेज मानून तिने अंजनाद्री टेकडीवर नृत्य सादर केले आणि शिखरावर विराजमान भगवान हनुमानाला हे अनोखे नृत्य अर्पण केले.

हेही वाचा – Veda Sarfare Swimming Video: रत्नागिरीच्या दीड वर्षांच्या वेदाची अविश्वसनीय कामगिरी; 100 मीटर अंतर पार करून बनली सर्वात लहान जलतरणपटू

भक्ती आणि कलेचे दिव्य सादरीकरण

कोप्पलमधील अंजनाद्री टेकडीवरील हनुमान माला विसर्जन समारंभादरम्यान हे अनोखे सादरीकरण पार पडले. भारतीय अध्यात्मात नृत्य हे भक्तीचा एक मार्ग मानला जातो आणि हर्षिताने ते प्रत्यक्ष अनुभवत देवाला अर्पण केले.

हेही वाचा – Konkan Hapus Mango : गुजरातचा डोळा आता हापूसवर, कोकण आंबा बागायतदारांची चिंता वाढली, नेमकं प्रकरण काय

हनुमान व्रतामुळे भाविकांचा प्रचंड जनसागर

अंजनाद्री हे भगवान हनुमानाचे जन्मस्थान मानले जाते. हनुमान माळा विसर्जनासाठी येथे पहाटे 1 वाजल्यापासून हजारो नव्हे तर लाखो भाविकांचा महापूर उसळला. मुख्य पुजारी विद्यादास बाबा यांच्या नेतृत्वाखाली विशेष पूजा, दूधाच्या अभिषेकात सहभागी होण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. हर्षिताचे हे सादरीकरण केवळ नृत्य नव्हते, तर ते भगवान श्रीराम व अंजनेयाच्या प्रति तिच्या भक्तीचे दर्शन होते. हर्षिताचा असा अविस्मरणीय प्रयोग पाहून उपस्थित भाविक थक्क झाले.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number